मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Diwali 2021: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी 'हा' चांगला पर्याय ठरेल

Diwali 2021: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी 'हा' चांगला पर्याय ठरेल

Physical Form Gold सोने खरेदी करण्यापेक्षा Digital Gold गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. याचे कारण म्हणजे पेटीएम, गुगल पे, फोनपे इत्यादी ई-वॉलेट्स त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेत डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत.

Physical Form Gold सोने खरेदी करण्यापेक्षा Digital Gold गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. याचे कारण म्हणजे पेटीएम, गुगल पे, फोनपे इत्यादी ई-वॉलेट्स त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेत डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत.

Physical Form Gold सोने खरेदी करण्यापेक्षा Digital Gold गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. याचे कारण म्हणजे पेटीएम, गुगल पे, फोनपे इत्यादी ई-वॉलेट्स त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेत डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 नोव्हेंबर : भारत (India) हा सोनं (Gold)आयात (Import) करणारा जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. आपल्या देशात सोन्याची प्रचंड मागणी असते. सणासुदीच्या काळात (Festival Season) तर आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते कारण शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ (Auspicious) मानलं जातं. वर्षातील साडे तीन शुभ मुहूर्तांवर तर सोनं खरेदी केली जातेच. सध्या दिवाळीच्या (Diwali) शुभ पर्वातही लोक सोने खरेदीसाठी उत्सुक आहेत. सध्या कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानं लोकांचा उत्साह दुणावला आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सोन्याच्या दरातही गेल्या काळापासून घट झाली आहे, त्यामुळे दिवाळीच्या काळात विशेषतः धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर (Dhanteras)सोनं खरेदी मोठ्या प्रमाणत वाढण्याची आशा सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. तुम्हीही सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दागिने, डिजिटल गोल्ड, ईटीएफ किंवा गोल्ड बाँडमध्ये काय खरेदी करणे फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊ या...

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बहुतांश लोक दिवाळी किंवा सणाच्या काळात सोने खरेदी करताना दागिने (Gold Ornaments) खरेदी करतात. मात्र गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचा उद्देश असेल तर सोन्याच्या दागिन्यांपेक्षा नाणी (Gold Coins)खरेदी करणे फायदेशीर ठरते. कारण सोन्याच्या दागिन्यांवर 10 ते 15 टक्के (घडणावळ) मेकिंग चार्जेस (Making Charges) आकारले जातात. परंतु जेव्हा तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने विकायला जाता तेव्हा तुम्हाला सोन्याच्या किमतीएवढीच रक्कम मिळते आणि मेकिंग चार्जेसचे नुकसान होते. मात्र तुम्ही सोन्याची नाणी खरेदी करता तेव्हा त्यावर मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. तुमचे नुकसान टळते. त्यामुळे दिवाळीत सोने खरेदी करायचे असेल तर दागिन्यांपेक्षा सोन्याची नाणी खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्ला कमोडीटी तज्ज्ञांनी दिला आहे.

दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, 268 रुपयांनी महागला कमर्शियल LPG Gas Cylinder

अलीकडच्या काळात प्रत्यक्ष म्हणजे भौतिक स्वरूपातील (Physical Form Gold) सोने खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोन्यात (Digital Gold) गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. याचे कारण म्हणजे पेटीएम, गुगल पे, फोनपे इत्यादी ई-वॉलेट्स त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे अगदी 100 रुपये इतक्या कमी रकमेत डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत. मात्र नुकतेच भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI)गुंतवणूक सल्लागारांना डिजिटल सोन्यात व्यापार न करण्याचे निर्देश दिले आहेत. काही गुंतवणूक सल्लागार डिजिटल सोन्यासह अनियंत्रित उत्पादनांची खरेदी, विक्री किंवा व्यापार करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असल्याचे आढळले आहे. मात्र डिजिटल गोल्ड खरेदीसाठी अन्य विश्वासार्ह पर्यायही उपलब्ध आहेत. यामध्ये गोल्ड बाँडस, ईटीएफ आदींचा समावेश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)वर्षातून अनेक वेळा गोल्ड बाँड अर्थात सुवर्ण रोखे (GOld Bond)जारी करते. यामध्ये सोन्याची किंमत बहुतेक वेळा बाजारभावापेक्षा थोडी कमी असते तसेच गुंतवणुकीवर २.५ टक्के व्याज मिळते. या योजनेची मुदत आठ वर्षांची आहे, परंतु गरज पडल्यास पाच वर्षांनी त्यातील गुंतवणूक काढून घेता येते. एक ग्रॅम सोन्याच्या किमतीएवढी रक्कम गुंतवण्याचीही सोय आहे. गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीसाठी डिजिटल स्वरूपात पेमेंट केल्यास प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांची सूटदेखील मिळते. सोने सुरक्षित ठेवण्यासाठी होणारा खर्च वाचवण्यासह व्याज मिळण्याची सोय देणारी ही अभिनव योजना सोने गुंतवणूकीचा उत्तम लाभ देणारी आहे.

दररोज 200 रुपये गुंतवणूक करुन मिळेल 32 लाखांचा फंड, काय आहे योजना आणि किती असेल कालावधी

गोल्ड ईटीएफ (Gold ETF) ही म्युच्युअल फंडाची (Mutual Fund)योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार युनिटनुसार सोने खरेदी करू शकतात. गुंतवणूकदार जेव्हा सोने विकतात तेव्हा त्यांना त्या वेळी बाजारभावानुसार पैसे दिले जातात. देशातील अनेक म्युच्युअल फंड कंपन्या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. दीर्घ मुदतीसाठी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवू शकतात. छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा उत्तम पर्याय असल्याचे वित्तीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तेव्हा दिवाळीच्या (Diwali) शुभपर्वात किंवा धनत्रयोदशीच्या (Dhanteras)मुहूर्तावर सोने खरेदी करायचे असेल तर दगिन्याऐवजी नाणी घेणे किंवा डिजिटल स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.यातून जोखीम कमी आणि परतावा जास्त मिळेल.

First published:

Tags: Diwali 2021, Gold, Money