मराठी बातम्या /बातम्या /मनी /दररोज 200 रुपये गुंतवणूक करुन मिळेल 32 लाखांचा फंड, काय आहे योजना आणि किती असेल कालावधी

दररोज 200 रुपये गुंतवणूक करुन मिळेल 32 लाखांचा फंड, काय आहे योजना आणि किती असेल कालावधी

तुम्ही वाचवलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवलीत तर त्यावर चांगलं व्याज मिळून काही वर्षांत मोठी रक्कम जमा होऊ शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF अशीच एक सरकारी योजना आहे, ज्यात लहान गुंतवणुकीवर मोठा फंड तयार करता येतो.

तुम्ही वाचवलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवलीत तर त्यावर चांगलं व्याज मिळून काही वर्षांत मोठी रक्कम जमा होऊ शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF अशीच एक सरकारी योजना आहे, ज्यात लहान गुंतवणुकीवर मोठा फंड तयार करता येतो.

तुम्ही वाचवलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवलीत तर त्यावर चांगलं व्याज मिळून काही वर्षांत मोठी रक्कम जमा होऊ शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF अशीच एक सरकारी योजना आहे, ज्यात लहान गुंतवणुकीवर मोठा फंड तयार करता येतो.

    नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : थोडे-थोडे पैसे बाजूला टाकूनही चांगली बचत करता येते. तुम्ही वाचवलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवलीत (Investment) तर त्यावर चांगलं व्याज मिळून काही वर्षांत मोठी रक्कम जमा होऊ शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund PPF) अशीच एक सरकारी योजना आहे, ज्यात लहान गुंतवणुकीवर मोठा फंड तयार करता येतो.

    PPF मध्ये पैसे गुंतवले की ते बुडणार नाहीत ही हमी मिळते कारण ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर इन्कम टॅक्स लागत नाही. तुमची बचत वारसाला द्यायची सुविधा या योजनेत असून 15 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खातं उघडू शकतो. भारतीय पोस्ट विभाग (Indian Post department and Banks) आणि कुठल्याही बँकेमध्ये हे खातं उघडलं जाऊ शकतं. याची 15 वर्षांची मुदत संपल्यानंतर 5 वर्षांची मुदतवाढ तीन वेळा घेता येते. सध्या पीपीएफवर 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे.

    केवळ 500 रुपये भरून तुम्ही हे अकाउंट उघडू शकता. त्यानंतर त्या वर्षापासून दरवर्षी एप्रिल ते पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत (One Financial Year) तुम्ही या खात्यात कमीतकमी 500 रुपये ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता. यात गुंतवलेले पैसे पहिली पाच वर्षं तुम्ही काढू शकत नाही हा त्याचा लॉकिंग पिरीयड आहे. त्यानंतर तुम्ही या खात्यातून काही रक्कम काढू शकता. सरकार या योजनेवरील व्याज दर ठराविक काळानंतर बदलत असतं.

    मुलीचं भविष्य करा सुरक्षित; 'या' योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 15 लाख

    तुम्ही जर या योजनेत दररोज 200 रुपये गुंतवणूक केली, तर महिन्याला तुमची गुंतवणूक 6 हजार रुपये होईल. म्हणजे वर्षाला गुंतवणूक (Total Investment) होईल 72 हजार रुपये. असे वर्षाला तुम्ही 72 हजार वाचवून पीपीएफमध्ये गुंतवणूक केलीत तर तुमची 15 वर्षांनंतरची गुंतवणूक असेल 10 लाख 80 हजार रुपये.

    पीपीएफ खात्यावर सरकारकडून मिळणाऱ्या 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाचा विचार केला, तर 20 वर्षांनंतर तुम्हाला रिटर्न म्हणून 14.40 लाख रुपये मिळतील. तुम्ही केलेल्या एकूण गुंतवणुकीवर 17.55 लाख रुपये व्याज मिळू शकेल. अगदी सरळ सांगायचं तर 20 वर्षांत तुमच्याकडे एकूण 32 लाख रुपयांचा फंड असेल.

    Post Office Scheme: दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख

    कंपाउंड इंट्रेस्‍ट म्हणजेच चक्रवाढ व्याजाचं सूत्र -

    A=P (1+r/n)nt

    A: मूळ गुंतवणूक केलेली मुद्दल

    P: मुद्दल

    r: व्याज दर

    n: एका वर्षात किती वेळा चक्रवाढ व्याज मिळालं

    nt: एकूण किती काळ गुंतवणूक केली.

    या सूत्राचा वापर करून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर किती चक्रवाढ व्याज मिळू शकतं हे काढता येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या लवकर ही गुंतवणूक सुरू केली तर जास्त काळ गुंतवणूक होऊन दीर्घ काळ फायदा मिळेल.

    First published:

    Tags: Money, PPF