नव्या कर प्रणालीत काय आहे TAX FREE? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

नव्या कर प्रणालीत काय आहे TAX FREE? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

1 एप्रिल 2020 पासून नवी करप्रणाली लागू होत आहे. ज्यामध्ये अशा 30 सूट आहेत ज्या पुढेही सुरू राहतील. यामध्ये प्रामुख्याने शेती उत्पन्न, PPF आणि सुकन्या खात्यावरील व्याजाच्या रकमेवर सुट मिळत राहिल.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी - 1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात (Financial Year 2020-2021) तुम्हाला दोन करप्रणाली (Income Tax New Systems) मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की त्यापैकी तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. अर्थसल्लागांच्या मतानुसार, नवी करप्रणाली स्वीकारणाऱ्यांच्या 70 करांमध्ये (Income tax deductions and exemptions in india 2020) कपात होणार आहे. तर यामध्ये सेक्शन 80 सीच्या (80C) अनुसार गुंतवणुकीवर मिळणारी 1.5 रुपयांपर्यंत सूट, सेक्शन 80 डीच्यानुसार (80D) आरोग्य विमा रक्कम (Insurance Premium Payments) आणि सेक्शन 80 टीटीए च्या नुसार बचत खाते किंवा पोस्ट खात्यामध्ये (Post Office Account) मिळणाऱ्या व्याजदरातील कपात सहभागी असणार आहे. मात्र 30 अशा सूट आहेत ज्या पुढेही मिळणार आहेत. तज्ज्ञांच्या म्हणणं आहे की, यामध्ये प्रमुख शेतीतून होणारं उत्पन्न, पीपीएफ (PPF) आणि सुकन्या खात्यातील (Sukanya Scheme) व्याज रकमेवर सूट मिळत राहिल.

प्रश्न - जर मी नव्या करप्रणालीचा स्विकार केला तर मला PPF, EPF च्या व्याजावर करामध्ये सूट मिळेल का?

अर्थतज्ज्ञांचं उत्तर - नव्या करप्रणालीचा स्विकार केल्यानंतर PPF, EPF च्या गुंतवणुकीवर करामध्ये सूट मिळणार नाही. जर PPF च्या खात्यातील व्याजावर सुट मिळत राहिली तर तिकडे मिळणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधीवरही (PROVIDENT FUND) कोणताही कर लागणार नाही. नव्या टॅक्स स्लॅबनुसार PPF खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर आपल्याला टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. तर यामधून मिळणाऱ्या व्याज आणि मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कम कर कक्षेच्या बाहेर असेल.

आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं PAN होणार रद्द!

तर वेतनासोबत कट होणाऱ्या EPF वर 9.5 टक्क्यांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स लागणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त EPF आणि NPS मध्ये कंपनीकडून जमा होणारी रक्कही टॅक्स फ्री असेल. परंतू दरवर्षी 7.5 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवरच हा फायदा मिळणार आहे. तिकडे PPF मध्ये पैसे भरणाऱ्यांना मात्र टॅक्समधून सूट मिळणार नाही. मात्र मॅच्योरिटीची रक्कम आताही टॅक्स फ्रीच असणार आहे.

प्रश्न - मी माझ्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खातं उघडलं आहे. तर त्यामध्ये 1 एप्रिलपासून काय बदल होती?

अर्थतज्ज्ञांचं उत्तर - जुनी करप्रणाली स्विकारणाऱ्याला करातील सूटीसोबतच जुने सगळे फायदे मिळत राहणार आहेत. तर नवी करप्रणाली स्विकारणाऱ्या सुकन्या खातेदारांना गुंतवणुकीत व्याजावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. जर सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर यातून होणाऱ्या कमाईमध्येही कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र पहिल्यासारखंच सुकन्या खात्यावर सेक्शन 80 सीच्या प्रमाणे पैसे जमा करण्यावर 1.5 लाख रुपयांपर्यंत ही सूट मिळणार नाही.

नव्या करप्रणालीमध्ये या सूट मिळतील

1. भाड्यावर जबरदस्त कपात

2. शेतीतून होणारं उत्पन्न

3 PPF वर मिळणारं व्याज

4. विम्याच्या मॅच्योरिटीची रक्कम

5. मृत्यूनंतर मिळणारी विम्याची रक्कम

6. सूटीवर मिळालेला मोबदला

7. निवृत्तीनंतर मिळणारी इनकॅशमेंट

8. VRS - स्वेच्छा निवृत्ती

9. सुकन्या समृद्धी खात्यावर मिळालेली रक्कम

ATM च्या वापरावर मोजावं लागणार ज्यादा शुल्क

First published: February 16, 2020, 11:18 AM IST

ताज्या बातम्या