नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आधार (Aadhaar Card)बरोबर जोडणं अनिवार्य केलं आहे. देशभरात 30.75 कोटींहून जास्त पॅनधारक आहेत. मात्र 27 जानेवारी 2020 पर्यंत 17.58 कोटी पॅनधारकांनी आधारसोबत पॅन कार्ड (PAN Aadhaar Card) लिंक नाही केलं आहे. पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून अशा नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Aadhaar Link Mandatory) नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख (PAN Aadhaar Link Deadline) अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे, ज्यानंतर तुमचं पॅन कार्ड अन-ऑपरेटिव्ह होईल म्हणजेच तुम्हाला पुढील 45 दिवसात हे काम पूर्ण करावंच लागेल. अनेकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे लिंकिंगसाठीची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने 31 मार्च 2020 पर्यंत ही मुदत वाढवली आहे. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2019 ला संपणार होती. आतापर्यंत 8 वेळा आधार-पॅन लिंकिंगची मुदत वाढवली आहे. 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. (हेही वाचा- Vodafone-idea, Airtel होणार का बंद? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कंपन्या अडचणीत ) तुम्ही जर 31 मार्चपर्यंत आधार-पॅन लिंक केलं नाही तर तर तुमचं पॅन कार्ड रद्द होणार आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील. आधार-पॅन लिंकिंग कसं कराल? -आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. -तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या. -तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल. -‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल -याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते. -UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







