जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Indian Railways: रेल्वे स्टेशनच्या मागे लिहिलेलं असतं टर्मिनल, सेंट्रल आणि जंक्शन! पण याचा अर्थ काय?

Indian Railways: रेल्वे स्टेशनच्या मागे लिहिलेलं असतं टर्मिनल, सेंट्रल आणि जंक्शन! पण याचा अर्थ काय?

सेंट्रल, जंक्शन, टर्मिनलचा अर्थ काय?

सेंट्रल, जंक्शन, टर्मिनलचा अर्थ काय?

Indian Railways: एखाद्या स्टेशनच्या शेवटी सेंट्रल लिहिले असेल तर त्याचा अर्थ त्या शहरात एकापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. ज्या स्टेशनमध्ये सेंट्रल लिहिले आहे ते त्या शहरातील सर्वात जुने आणि व्यस्त रेल्वे स्टेशन आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 2 जून :  रेल्वे हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या लांब रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे, रेल्वे प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचवते. एवढंच नाही तर रेल्वे प्रमुख मालवाहतूक म्हणूनही काम करते. तुम्ही अनेकदा रेल्वे स्टेशनवर गेला असाल. पण तुम्हाला रेल्वे स्टेशनवर लिहिलेला जंक्शन, सेंट्रल, टर्मिनल/टर्मिनसचा अर्थ माहीत आहे का?

    News18लोकमत
    News18लोकमत

    रेल्वे जंक्शन

    अनेक स्टेशनच्या नावांमागे जंक्शन लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. हे मोठ्या स्टेशनच्या नावाच्या मागे खूप वेळा लिहिलेलं असतं. जंक्शनला अशा रेल्वे स्टेशन म्हणतात, जिथे किमान 3 वेगवेगळ्या मार्गांवरून गाड्या येतात.

    Railway Facts: ट्रेन चालवायलाही ड्रायव्हिंग लायसन्स लागतं? लोको पायलट कसं बनता?

    टर्मिनल स्टेशन

    टर्मिनल किंवा टर्मिनस स्टेशनमध्ये फरक नाही. टर्मिनस किंवा टर्मिनल हा शब्द टर्मिनेशन या इंग्रजी शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ समाप्त होणे असा होतो. ही अशी स्टेशन असतात जिथे ट्रेनचा प्रवास संपतो. टर्मिनस किंवा टर्मिनल स्टेशनपलीकडे रेल्वे ट्रॅक नसतो. म्हणजे ज्या दिशेनं ट्रेन इथे येते, त्याच दिशेनं परत जात

    सेंट्रल स्टेशन

    जर एखाद्या स्टेशनच्या शेवटी सेंट्रल लिहिले असेल तर त्याचा अर्थ त्या शहरात एकापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. ज्या स्टेशनमध्ये सेंट्रल लिहिले आहे ते त्या शहरातील सर्वात जुने आणि व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, कानपूर सेंट्रल इत्यादी त्याची उदाहरणे आहेत.

    Train wheel: ट्रेनची चाकं बदलताना येतात नाकी नऊ! बदलण्याची प्रोसेस पाहून तुम्हीही व्हाल चकीत

    कँट स्टेशन्स म्हणजेय काय?

    कँट स्टेशन हे असे स्टेशन असतात जी मिलिट्री एरिया/छावणीजवळ वसलेली असतात. उदा. दिल्ली कँट, अंबाला कँट, आग्रा कँट इत्यादी त्याची उदाहरणे आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात