Home /News /maharashtra /

'हे सरपंच शंभर नंबरी सोनं आहे, 10 गावात सापडणार नाही!' कोरोनातही अशी झाली गावकऱ्यांची दिवाळी गोड

'हे सरपंच शंभर नंबरी सोनं आहे, 10 गावात सापडणार नाही!' कोरोनातही अशी झाली गावकऱ्यांची दिवाळी गोड

'गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त महत्त्वाचा आहे...'

    औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जवळ असलेलं आदर्श गाव पाटोदाच्या (Patoda) सरपंचांनी सध्या महाराष्ट्रभरात चर्चा आहे. दिवाळीच्या (Diwali 2020 ) सणात तर सरपंचांनी उचललेल्या पावलामुळे अख्खं गाव त्यांचं कौतुक करत आहे. गावातल्या महिला इतक्या आनंदात आहेत की दिवाळीत केवळ 2 गोड पदार्थ नाही तर 4 करणार असल्याचे सांगतात.  या गावाची आणखी एक खासियत म्हणजे कोरोनाच्या संकटातही गावकऱ्यांनी 100 टक्के टॅक्स भरला, याची पोचपावती म्हणजे गावकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. कोरोनामध्ये (Coronavirus) सर्वांनाच मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यात पाटोदा गावातील तर अधिकतर जणांचं पोट जवळील औरंगाबाद शहरावर अवलंबून आहे. अशावेळी गावाचीही अर्थव्यवस्था बिघडली होती. मात्र असं असतानाही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबीयांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर  20 रुपयांनी दिली आहे. यामुळं गावकऱ्यांना बाजारात 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर वीस रुपयात मिळाली आणि तेही 25 किलो. हे ही वाचा-घरात सुरू होतं सर्वात मोठं सेक्स रॅकेट; आक्षेपार्ह अवस्थेत सापडले तरुण-तरुणी याशिवाय गावाला आदर्श म्हणता येईल असे अनेक उपक्रम येथे राबवले जातात. गावकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट, शेवया, कुरडया, पापड आणि डाळ फुकट करून मिळतात. यावर गावचे संरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सांगितलं की, कोरोनाच्या काळात गावात अतिशय योग्य ती काळजी घेतली गेली होती. गावात ठिकठिकाणी बेसिन्स बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिवाळी ही साजरी करताना गावकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी काय करता येऊ शकतं याची चर्चा सुरू होती. त्यातून एक प्रस्ताव पुढे आला की दिवाळीत सवलतीच्या दरात साखर मिळाली तर बरीच मदत होईल. यासाठी आम्ही लातूरच्या एका कारखान्याशी संपर्क साधला. त्यानी आम्हाला 30 रुपये किलोने साखर देण्याचं ठरवलं. मग ग्रामपंचायतीने काही भार उचलायचा निर्णय घेतला आणि आम्ही गावकऱ्यांना 20 रुपये किलोने साखर देण्याचं ठरवलं. कोरोनाच्या संकटात ग्रामपंचायतीचा कर जर गावकऱ्यांनी नियमित भरला असेल तर त्यांची दिवाळी ही आनंदात जायला हवी, यातून ही संकल्पना पुढे आल्याचे सरपंचानी सांगितले. यूट्यूबवर त्यांचे भाषण खूप प्रसिद्ध आहे. त्यापैकी एका भाषणाचा भाग... गावकऱ्यांचे किती पैसे वाचले यापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त महत्त्वाचा असल्याचे भास्कर पेरे पाटील सांगतात. भास्कररावांवर त्यांच्याच गावातील एका 70 वर्षांच्या कलाबाई मुचक म्हणतात..आमचे सरपंच म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे..10 गावात सापडणार नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aurangabad, Diwali 2020, धनत्रयोदशी 2020

    पुढील बातम्या