मुंबई, 10 नोव्हेंबर : धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यालाही अनेकजण प्राधान्य देतात. यात मोबाइल फोन, लॅपटॉप, ओवन, फ्रिज अशा गोष्टी विकत घ्यायला प्राधान्य देतात. व्यवसायाशी निगडीत गोष्टी- धनत्रयोदशीला तुमच्या व्यवसायाशी निगडीत कोणतीही गोष्ट खरेदी करा. विकत घेतलेल्या गोष्टींची दिवाळीच्या पहिल्या दिवशी पूजा करा. झाडू- धनत्रयोदशीला झाडू विकत घेणं शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, झाडू विकत घेतल्याने आर्थिक संकटं दूर होतात. धनत्रयोदशीला विकत घेतलेली झाडू घरातली नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य नष्ट होतं. इलेक्ट्रॉनिक वस्तू- धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यालाही अनेकजण प्राधान्य देतात. यात मोबाइल फोन, लॅपटॉप, ओवन, फ्रिज अशा गोष्टी विकत घ्यायला प्राधान्य देतात. धणे- धनत्रयोदशीला संपूर्ण धणे विकत घेतल्याने घरात सुख- शांती नांदते असं म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना तिला धण्याचा प्रसाद दाखवा आणि ते तिजोरीत ठेवा. भांडी- धनोत्रयोदशीला भांडी विकत घेण्याची प्रथा आहे. जर तुम्ही याबाबतीत थोडे संभ्रमात असाल तर तुम्ही पितळेची भांडी विकत घेऊ शकता. भांडी विकत घेतल्यानंतर ती घराच्या पूर्व दिशेला ठेवा. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.