Home /News /money /

शेअर बाजारात घसरणीदरम्यान 'या' IT स्टॉकमध्ये तेजी, काय आहे कारण? तज्ज्ञांचं मत काय?

शेअर बाजारात घसरणीदरम्यान 'या' IT स्टॉकमध्ये तेजी, काय आहे कारण? तज्ज्ञांचं मत काय?

आयटी क्षेत्रातील न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या (Nucleus Software Exports Ltd) शेअरने इंट्राडेमध्ये 10 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. कालच्या व्यवहारात, शेअर 1.80 रुपये प्रति शेअरच्या डाउनसाइड गॅपवर उघडला,

    मुंबई, 22 जानेवारी : बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. सलग चार दिवसांच्या घसरणीदरम्यान गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. असं असलं तरी आयटी क्षेत्रातील न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या (Nucleus Software Exports Ltd) शेअरने इंट्राडेमध्ये 10 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. कालच्या व्यवहारात, शेअर 1.80 रुपये प्रति शेअरच्या डाउनसाइड गॅपवर उघडला, पण लवकरच तो वाढू लागला आणि तो इंट्राडेमध्ये 425 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आणि मागील मंदीच्या तुलनेत तो 10 टक्क्यांहून अधिक वाढला. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या स्टॉकमध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही गोष्टी तयार केल्या असून हा शेअर 640 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. न्यूक्लियस सॉफ्टवेअरच्या बायबॅकची नुकतीच केलेली घोषणा आणि व्हिएतनाम कमर्शियल बँकेकडून (Vietnam Commercial Bank ) मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे बाजाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याशिवाय, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर या स्टॉकमध्ये 575 रुपयांचा लेव्हलवर फ्रेश ब्रेकआउट देखील देण्यात आला आहे. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे या शेअरमध्ये तेजीच्या कारणांबद्दल बोलताना Profitmart Securities चे अविनाश गोरक्षकर म्हणाले की, न्यूक्लियस सॉफ्टवेअरला प्रति शेअर 700 रुपये दराने बायबॅक करण्याच्या घोषणेवर बाजार प्रतिक्रिया देत आहे. यासोबतच याला व्हिएतनाम कमर्शियल बँकेकडून (Vietnam Commercial Bank) मोठी ऑर्डर मिळाली आहे, ज्यामुळे कंपनीच्या निर्यातीत 4.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Cryptocurrency गुंतवणूकदारांचे 18 ट्रिलियन डॉलरचं नुकसान, Bitcoin ला देखील फटका SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे मुदित गोयल म्हणतात की या स्टॉकचा चार्ट पॅटर्न पॉझिटिव्ह दिसत आहे. याने 575 रुपयांच्या पातळीवर नवीन ब्रेकआउट दिला आहे आणि लवकरच तो 640 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. अशा स्थितीत सध्याच्या पातळीवरही या शेअरमध्ये खरेदी करता येईल. यासाठी 550 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा, असं गोयल यांनी सांगितलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या