Home /News /money /

Cryptocurrency गुंतवणूकदारांचे 18 ट्रिलियन डॉलरचं नुकसान, Bitcoin ला देखील फटका

Cryptocurrency गुंतवणूकदारांचे 18 ट्रिलियन डॉलरचं नुकसान, Bitcoin ला देखील फटका

भारतीय गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले बिटकॉइन (Bitcoin) 7 टक्क्यांनी घसरले आणि त्याची किंमत 36,579 डॉलरवर पोहोचली. रुपयाच्या बाबतीत शनिवारी सकाळी ट्रेडिंगच्या वेळी एका बिटकॉइनचे मूल्य 29,63,463 रुपये होते.

    मुंबई, 22 जानेवारी : जगभरात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) वाढती लोकप्रियता पाहता त्याबाबत चिंताही वाढत आहे. गेल्या 24 तासांत, जगभरातील गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सुमारे 18 ट्रिलियन डॉलर गमावले आहेत. बिटकॉइन गुंतवणूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ग्लोबल मार्केटवर नजर टाकली तर लक्षात येतं की गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटचे एकूण भांडवल 17-18 ट्रिलियन डॉलरने घसरले आहे. भारतीय गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले बिटकॉइन (Bitcoin) 7 टक्क्यांनी घसरले आणि त्याची किंमत 36,579 डॉलरवर पोहोचली. रुपयाच्या बाबतीत शनिवारी सकाळी ट्रेडिंगच्या वेळी एका बिटकॉइनचे मूल्य 29,63,463 रुपये होते. घट होऊनही, बिटकॉइनचा एकूण बाजारातील हिस्सा सर्वाधिक 40.51 टक्के राहिला आहे. इथरियम दुसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी सुद्धा 9 टक्क्यांनी जबरदस्त घसरली आणि सकाळच्या ट्रे़डिंगमध्ये 2,11,277.4 रुपयांची किंमत गाठली. Dogecoin नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर Cryptocurrency Dogecoin ची किंमत शनिवारी सकाळी 0.14 डॉलरवर घसरली. एप्रिल 2021 नंतरची ही नीचांकी पातळी आहे. गेल्या 24 तासांत त्यात 9 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी मोठी झेप घेतलेले मेम कॉईनही त्याच्या शिखरावरून 81 टक्क्यांनी खाली आले आहे. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे एकीकडे, बिटकॉइनसह अनेक क्रिप्टोकरन्सींमध्ये घट दिसून आली, तर दुसरीकडे डिसेन्ट्रलाईज्ड फायनान्सचे (DeFi) क्रिप्टो बाजार भांडवल 123.14 टक्क्यांनी वाढून 120.97 डॉलर अब्ज झाले. या बाजारातील लोकप्रिय चलन, stablecoin चे मूल्य 115 डॉलर अब्ज आहे, जे एकूण क्रिप्टो बाजाराच्या सुमारे 7 टक्के आहे. स्टेबलकॉइन्सची किंमत स्थिर ठेवण्यासाठी डॉलर किंवा सोन्यासारख्या स्थिर चलनांसोबत जोडून व्यापार केला जातो. SBI Alert : एसबीआयची ऑनलाईन सेवा उद्या बंद राहणार, वाचा सविस्तर माहिती या देशात व्यवहारात सूट मिळेल ब्राझिलियन वित्तीय सेवा प्रदाता डॉकने म्हटले आहे की ते लवकरच क्रिप्टोला आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येईल. लवकरच ही सुविधा लॅटिन अमेरिकन देश आणि युरोपमध्ये सुरू होणार आहे. अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी Robinhood Markets Inc. ने त्यांच्या 1,000 ग्राहकांना क्रिप्टो वॉलेट्स देखील प्रदान केले आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या ब्रोकरेज खात्यांद्वारे क्रिप्टोकरन्सी पाठवता आणि प्राप्त करता येतात. 2022 मध्ये कंपनी या सेवेचा आणखी विस्तार करणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Investment, Money

    पुढील बातम्या