जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update: शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहणार? आज गुंतवणुकीआधी तपासा तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहणार? आज गुंतवणुकीआधी तपासा तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Update: शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहणार? आज गुंतवणुकीआधी तपासा तज्ज्ञांचा अंदाज

मागील सत्रात शुक्रवारी जवळपास 1,100 अंकांनी घसरून सेन्सेक्स 58,841 वर बंद झाला होता, तर निफ्टी 350 अंकांनी घसरून 17,531 वर बंद झाला होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : शेअर बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. हा घसरणीचा कल सोमवारीही कायम राहू शकतो. जागतिक बाजाराच्या दबावाखाली गुंतवणूकदार आठवड्याची सुरुवात विक्रीसह करू शकतात. मागील सत्रात जवळपास 1,100 अंकांनी घसरून सेन्सेक्स 58,841 वर बंद झाला होता, तर निफ्टी 350 अंकांनी घसरून 17,531 वर बंद झाला होता. तज्ञांचे म्हणणे आहे की आजच्या ट्रेडिंगमध्येही गुंतवणूकदारांच्या भावनांवर दबाव असेल, ज्यामुळे ते विक्रीकडे जाऊ शकतात. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येतो. गेल्या काही सत्रांचा कल पाहता शेअर बाजारात सतत दबावात आहे.

Post Office : पोस्टच्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपये गुंतवाल तर करोडपती व्हाल!

यूएस आणि युरोपियन बाजार अमेरिकेतील महागाई आणि बेरोजगारीच्या आकड्यांनी बाजाराची स्थिती खराब झाली आहे. त्यात फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदरात मोठी वाढ करण्याचे संकेत देऊन कर्ज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजाराच्या भावनेवरही दिसून येत आहे. यामुळेच अमेरिकेच्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये समाविष्ट असलेल्या नॅसडॅकमध्ये शेवटच्या सत्रात 0.95 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. अमेरिकेच्या धर्तीवर युरोपीय बाजारही शेवटच्या सत्रात दबावाखाली होते. युरोपातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये समाविष्ट असलेला जर्मनीचा शेअर बाजार 1.66 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर फ्रेंच शेअर बाजार 1.31 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे, लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 0.62 टक्क्यांची मोठी घसरण झाली. आशियाई बाजारात संमिश्र कल आशियाई बाजारात आज गुंतवणूकदारांचा संमिश्र कल दिसून येत आहे. सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आज सकाळी 0.16 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे, तर तैवानचा शेअर बाजार आज सकाळी 0.07 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे, परंतु आज दक्षिण कोरियाच्या कॉस्पीमध्ये 0.30 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. चीनचा शांघाय कंपोझिट देखील 0.03 टक्क्यांनी घसरत आहे. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केलीय? सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट विदेशी गुंतवणूकदारांची या महिन्यातील सर्वात मोठी विक्री भारतीय शेअर बाजारात सातत्याने गुंतवणूक करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या ट्रेडिंग सत्रात या महिन्यातील सर्वात मोठी विक्री केली आणि हेच बाजारातील मोठ्या घसरणीचे कारण ठरले. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील सत्रात 3,260.05 कोटी रुपयांचे शेअर विकले. दरम्यान, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही 36.57 कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात