जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केलीय? सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केलीय? सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारकडून एकंदर आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन दर तीन महिन्यांनी स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली जाते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    भारत सरकारतर्फे जनतेसाठी विविध आर्थिक योजना (Government Approved Financial Schemes) राबवल्या जात असतात. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC), सुकन्या समृद्धी योजना अशा अल्पबचत योजना अर्थात Small Savings Schemes सरकारकडून सुरू असून, त्यात समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतले नागरिक गुंतवणूक करू शकतात. कारण नावाप्रमाणेच त्यात अगदी अल्प प्रमाणातही बचत करता येते. दर तीन महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन या योजनांवरच्या व्याजदरामध्ये वाढ किंवा कपात केली जाते. या वेळी दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये या योजनांच्या व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या योजनांतल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिण्याची शक्यता आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. केंद्र सरकारकडून एकंदर आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन दर तीन महिन्यांनी स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या आधी या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ (Increment in Interest Rates) होण्याचा अंदाज आहे. ( दसऱ्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्ता वाढल्यास इतकी होणार Salary ) कोरोना काळानंतर या योजनांच्या व्याजदरांत सरकारने बदल केलेला नाही. त्यामुळे गेले 27 महिने या आर्थिक योजनांचे व्याजदर स्थिरच आहेत. एप्रिल ते जून 2020 या तिमाहीदरम्यान झालेल्या बदलानंतर व्याजदरांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. सरकारी सिक्युरिटीजच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे या वेळी सरकारकडून या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बाँड्समधल्या उत्पन्नाच्या अनुषंगाने अल्पबचत योजनांच्या व्याजदरांत दर तीन महिन्यांनी वाढ किंवा घट केली जात असते. अल्पबचत योजनांचे सध्याचे व्याजदर असे आहेत - सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) - 7.1% नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) - 6.8% ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSC) - 7.4% सुकन्या समृद्धी योजना (SSY) - 7.6% 5 वर्षांसाठी आरडी - 5.8% 1 वर्षासाठी टर्म डिपॉझिट स्किम - 5.5% सेव्हिंग डिपॉझिट - 4% 1 ते 5 वर्षांसाठी टर्म डिपॉझिट – 5.5% ते 6.7% कोरोना (Corona Pandemic) आणि लॉकडाउन (Lockdown) या काळात सर्वच बँकांच्या बचत खात्यांचे, मुदत ठेवींचे आणि सर्वच प्रकारच्या बचतींचे व्याजदर घटले होते. अशा स्थितीत अल्पबचत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था सावरू लागल्यावर आता हळूहळू बँकांचे व इतर व्याजदर काही प्रमाणात वाढू लागले असले, तरी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्याचा फायदा देशाच्या जास्तीत जास्त नागरिकांना मिळतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात