मुंबई, 10 मे : क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) गेल्या काही दिवसांपासून प्रेशरमध्ये आहे; मात्र गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण क्रिप्टो बाजारात हाहाकार माजला आहे. आज, मंगळवारी सकाळी (10 मे) 10 वाजून 18 मिनिटांपर्यंतच्या 24 तासांत क्रिप्टो बाजार 8.58 टक्क्यांनी पडला होता. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप (Global Cryptocurrency Market Cap) घटून 1.42 ट्रिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. ही मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा कमी होणं ही मोठी गोष्ट आहे. Coinmarketcap च्या आकडेवारीनुसार, आज बिटकॉइनच्या (Bitcoin) मूल्यात 7.82 टक्के एवढी मोठी घट झाली आहे. ही करन्सी आज $31,080.91 वर ट्रेड करत आहे. इथेरियमचं मूल्य गेल्या 24 तासांत 5.58 टक्के घटून $31,080.91 एवढं झालं आहे. एका आठवड्यात बिटकॉइनचं मूल्य 19.26 टक्के, तर इथेरियमचं मूल्य 18.17 टक्क्यांनी घटलं आहे. Home Loan महागल्याने बजेट कोलमडलं? ‘या’ टिप्स फॉलो करुन तुम्ही EMI कमी करु शकता 2022 मध्ये बिटकॉइनचं मूल्य बरंच घसरलं आहे. आजची किंमत पातळी यंदाची सर्वांत नीचांकी आहे. एक जानेवारी 2022 रोजी या चलनाचं मूल्य 46,726 डॉलर्स एवढं होतं. आजचं त्याचं मूल्य $31,080.91 एवढं आहे. या हिशेबाने हे चलन यंदा आतापर्यंत 33 टक्क्यांनी घसरलं आहे. यापूर्वी 20 ऑगस्ट 2020 रोजी बिटकॉइनचं मूल्य 30 हजार डॉलर्सच्या खाली गेलं होतं आणि 29,807 डॉलर्सवर ट्रेड करत होतं. त्या घसरणीनंतर बिटकॉइनच्या मूल्यात जबरदस्त तेजी आली आणि 8 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचं मूल्य 67 हजार डॉलर्सपर्यंत पोहोचलं. कोणत्या कॉइन्समध्ये किती बदल? » एवलॉन्च (Avalanche) – किंमत : $44.24, बदल (24 तासांत) : -13.91%, एका आठवड्यात : -28.32% » सोलाना (Solana – SOL) – किंमत : $67.13, बदल (24 तासांत) : -11.29%, एका आठवड्यात : -24.03% » कार्डानो (Cardano – ADA) – किंमत: $0.6344, बदल (24 तासांत) : -10.97%, एका आठवड्यात : -19.81% » ट्रोन (TRON – TRX) – किंमत: $0.07717, बदल (24 तासांत) : -9.28%, एका आठवड्यात : -+10.39% » शिबा इनु (Shiba Inu) – किंमत: $0.00001558, बदल (24 तासांत): -12.97%, एका आठवड्यात : -25.34% » टेरा लूना (Terra – LUNA) – किंमत: $28.15, बदल (24 तासांत) : -55.34%, एका आठवड्यात : -66.79% » एक्सआरपी (XRP) – किंमत: $0.5084, बदल (24 तासांत) : -10.42%, एका आठवड्यात : -18.43% » बीएनबी (BNB) – किंमत: $313.47, बदल (24 तासांत) : 10.68%, एका आठवड्यात : -19.80% » डोजकॉइन (Dogecoin – DOGE) – किंमत: $0.1098, बदल (24 तासांत) : -10.56%, एका आठवड्यात : -16.63% Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार सर्वांत जास्त उसळी घेणारी कॉइन्स गेल्या 24 तासांत सर्वांत जास्त उसळी घेणाऱ्या टोकन्समध्ये Rakon (RKN), Metacyber (METAC) आणि BitBall (BTB) यांचा समावेश आहे. Rakonच्या (RKN) मूल्याने गेल्या 24 तासांत जबरदस्त उसळी घेतली आहे. 818.61 वाढीसह ही वाढ अद्याप सुरूच आहे. Metacyber (METAC) या चलनाच्या मूल्यात 603.91% वाढ झाली आहे. तिसऱ्या नंबरवर BitBall (BTB) आहे. त्यात 311.47 टक्के वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.