जाहिरात
मराठी बातम्या / मनी / क्रिप्टोकरन्सीमधील घसरणीमुळे अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार; Coinbase ने 1100 कर्मचाऱ्यांना काढलं

क्रिप्टोकरन्सीमधील घसरणीमुळे अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार; Coinbase ने 1100 कर्मचाऱ्यांना काढलं

क्रिप्टोकरन्सीमधील घसरणीमुळे अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार; Coinbase ने 1100 कर्मचाऱ्यांना काढलं

Coinbase हे जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज आहे. क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेली घसरण आणि त्यामधील घटत्या गुंतवणूकीदरम्यान कॉइनबेसने मंगळवारी 1,100 कर्मचाऱ्यांची काढून टाकण्याची घोषणा केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून : क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील सततच्या घसरणीचा परिणाम आता या क्षेत्रातील नोकऱ्यांवर होत आहे. Coinbase या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो-एक्स्चेंजपैकी एक कॉईनेबेसने त्याच्या 18 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. सिंगापूरस्थित कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कॉइनबेसने कर्मचार्‍यांना काढून टाकल्याबद्दल सूचित करण्यापूर्वी त्यांच्या सिस्टममध्ये लॉग-इन प्रवेश अक्सेस ब्लॉक केला होता. कॉइनबेस रिक्रूटमेंटचे माजी मॅनेजर (आशिया पॅसिफिक) क्लिंटन ग्लीव्ह म्हणाले, टर्मिनेशन नोटीसपूर्वी आमच्या सिस्टममध्ये प्रवेश बंद करण्यात आला होता. हे अशा वेळी घडले जेव्हा मी माझ्या टीमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. LPG घरगुती गॅस कनेक्शनसाठी जास्त पैसे मोजावे लागणार, रेग्युलेटरही महाग ग्लीव्ह यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये कॉस्टकटिंगच्या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आशिया पॅसिफिक रिजनमध्ये कॉइनबेस टीम तयार करण्यात आणि ते शून्यातून त्यांनी कसे योगदान दिले याची माहिती दिली. आमची संपूर्ण टीम सुरुवातीपासून तयार करून आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात इतरांपेक्षाही चांगली कामगिरी करूनही मला कॉइनबेसमधून काढून टाकण्यात आले. आता मी आशियामध्ये 12 वर्षे घालवल्यानंतर सिंगापूर सोडण्यासाठी आणि माझे संपूर्ण आयुष्य गुंडाळण्यासाठी मला 30 दिवस देण्यात आले आहेत. मला माहित आहे की आमच्या सीईओसाठी हा निर्णय घेणे सोपे होणार नाही, असं क्लिंटन ग्रीव्ह म्हणाले. येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार? Coinbase हे जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज आहे. क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेली घसरण आणि त्यामधील घटत्या गुंतवणूकीदरम्यान कॉइनबेसने मंगळवारी 1,100 कर्मचाऱ्यांची काढून टाकण्याची घोषणा केली. ब्रायन आर्मस्ट्राँग यांनी एका ब्लॉगमध्ये सांगितले की, कंपनीच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी या सर्व कर्मचाऱ्यांची सिस्टीम लॉक करण्यात आली आहे. सर्व कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे काढून टाकल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात