मुंबई : गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या मजबूतीनंतर आणि रशियावर नवीन निर्बंधांच्या घोषणेनंतर जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या दरांवरील दबाव वाढला आहे. ९ महिन्यातील कच्च्या तेलाच्या किंमतीने सर्वात कमी आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनीही मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या २४ तासांत ब्रेंट क्रूड 2 डॉलरपेक्षा जास्त घसरून $84.22 प्रति बॅरल झाले आहे. जे 9 महिन्यांतील सर्वात कमी असल्याचं सांगितलं जात आहे. WTI ची किंमत देखील दोन डॉलरपेक्षा जास्त घसरून प्रति बॅरल 76.84 डॉलरवर आली, जी 6 जानेवारीनंतरची सर्वात कमी असल्याचं सांगितलं जात आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेलवर होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज काही पेट्रोलच्या किंमतीमध्ये दिलासा मिळाला नाही.
Share Market : मंदीचं संकट! 2 दिवसांत 1900 अंकांनी कोसळला सेन्सेक्सदिल्ली, मुंबई या चार महानगरांमध्ये तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी ९६.७२ रुपये तर डिझेलसाठी ८९.६२ रुपये लीटरमागे मोजावे लागत आहेत. तर मुंबईतील नागरिकांना प्रति लिटर १०६.३१ रुपये द्यावे लागणार आहेत. डिझेलसाठी ९४. २७ रुपये द्यावे लागणार आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरल्यामुळे दसरा-दिवळीपर्यंत पेट्रोल स्वस्त होईल अशी नागरिकांना आशा आहे. मात्र याबाबत काय निर्णय होतो आणि यामध्ये दिलासा कधी मिळणार याकडे लोकांचे डोळे लागले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे.
बायकोला द्यायचं गिफ्ट किंवा मुलीच्या लग्नासाठी खरेदी करायचे दागिने, डॉलर घेऊन आलाय गुडन्यूजरोज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर येतात. रोज हे दर बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला जर हे दर घरबसल्या पाहायचे असतील तर तुम्ही SMS द्वारे हे दर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला 9224992249 किंवा 9223112222 किंवा 9222201122 नंबरवर SMS पाठवायचा आहे.
इंडियन ऑयलचे दर तुम्हाला हवे असतील तर तुमच्या शहराचा कोड (BPCL) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवायचा आहे. अशा प्रकारे लिहून पाठवलं तर तुम्हाला रोजचे दर कळू शकणार आहेत.