मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market : मंदीचं संकट! 2 दिवसांत 1900 अंकांनी कोसळला सेन्सेक्स

Share Market : मंदीचं संकट! 2 दिवसांत 1900 अंकांनी कोसळला सेन्सेक्स

आशियातील बहुतांश शेअर बाजार आज आपटला आहे. आज सकाळी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.92 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि या आठवड्यात शेअर बाजाराने 4 दिवसांपासून सुरू असलेला नकारात्मक कल कायम ठेवला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच ब्लॅक मंडे ठरला आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत आज मोठी घसरण झाली आहे. दुपारनंतर काहीशी सुधारणा झाली आणि सेन्सेक्स 950 अंकांपेक्षा अधिक अंकांनी कोसळून बंद झाला.

BSE सेन्सेक्स 953.70 अंकांनी कोसळला म्हणजे जवळफास 1.64 टक्क्यांनी घसरून 57145.22 वर बंद झाला. निफ्टी 50 अंकांनी घसरून 17016.30 वर बंद झाली. सोमवारी निफ्टी बँक 930 अंकांनी (2.35 टक्के) घसरून 38616.30 वर बंद झाली. सलग तिसऱ्या आठड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

आशियातील बहुतांश शेअर बाजार आज आपटला आहे. आज सकाळी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.92 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे, तर जपानचा निक्केई 2.21 टक्क्यांच्या घसरला आहे. हाँगकाँगच्या शेअर बाजारातही 1.18 टक्के आणि तैवानच्या बाजारात 1.16 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचा कोस्पी बाजारही 2.30 टक्क्यांच्या घसरला आहे.

सोन्याच्या दरावरही डॉलरचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर शेअर मार्केटमध्ये ५० हजार रुपयांच्या खाली आले आहेत. तर रुपयाने आज नवा रेकॉर्ड मोडला आहे. एक डॉलरसाठी ८१ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचा मोठा फटका बसला आहे. US फेडच्या निर्णयाचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसेच आशियातील बाजारपेठांना बसल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Share market, Stock Markets