Home /News /money /

Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम

Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम

डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत Network18 ग्रुपने कमाल केली असून आतापर्यंतचा सर्वाधिक नफा कमावला आहे.

    नवी दिल्ली, 18 जानेवारी: विश्वासार्ह बातमीदारीसाठी (Reliable News) ओळखल्या जाणाऱ्या नेटवर्क18 ग्रुपने (Network18 group) डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत (Q3) रेकॉर्डब्रेक कामगिरी (New Records) केली आहे. 31 डिसेंबर 2021 या दिवशी संपलेल्या तिमाहीत संस्थेनं तब्बल 373 कोटी रुपयांचं ऑपरेटिंग प्रॉफिट कमावलं आहे. आतापर्यंत कुठल्याही एका तिमाहीत कमावलेला हा सर्वोच्च नफा ठरला आहे. टीव्ही न्यूज, डिजिटल न्यूज आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगिरीचा संस्थेचा आलेख उंचावत चालल्याचे हे आकडे निदर्शक ठरले आहेत. याशिवाय याच तिमाहीत तब्बल 1657 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल 16.5 टक्के अधिक आहे. हा देखील आतापर्यंतचा कुठल्याही तिमाहीत नोंदवला गेलेला नवा विक्रमच ठरला आहे.  स्थानिक माध्यमांची प्रगती राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांप्रमाणेच गेल्या तिमाहीत स्थानिक डिजिटल माध्यमांची कामगिरी सरस ठरल्याचा हा परिणाम आहे. स्थानिक मार्केटमधून आलेले उत्तम प्रतिसाद आणि त्याचवेळी स्थानिक माध्यमांची कामगिरी यामुळे पहिल्यांदा स्थानिक माध्यमांनी नफ्याची नोंद केली आहे. टॅक्स वगळून नफ्याची मोजदाद केली तर त्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून 337 कोटींच्या प्रॉफिटचा विक्रम झाला आहे. महसूलात झालेली वाढ, मर्यादित खर्च आणि कमी फायनान्शिअल कॉस्ट या जोरावर कंपनीनं आपलं उद्दिष्ट साध्य केलं आहे.  डिजिटल जाहीरातींमध्ये वाढ गेल्या तिमाहीत डिजिटल जाहीरातींना मिळणारा प्रतिसाद वाढत चालला असून युजर्स आणि जाहीरातदार या दोघांचाही कल डिजिटल ऍडकडे वाढताना दिसत आहे. 2020 सालच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या तिमाहीत डिजिटल न्यूजनी जाहीरातींमधून मिळवलेला महसूल हा दुप्पट आहे. डिजिटल जाहीरातींना प्रचंड प्रतिसाद मिळत असून 2021 मध्ये मिळालेल्या महसूलाचा आकडाही पार झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.  अधिकाधिक लोकांपर्यंत माध्यम डिजिटल न्यूज गेल्या तिमाहीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल माध्यमांचा रिच हा 50 टक्के वाढला आहे. नावीन्यपूर्ण आणि विश्वासार्ह बातमीदारीच्या आधारेच हे शक्य झालं आहे. आम्ही एक सशक्त आणि सक्षम माध्यम उभं करण्याचा प्रयत्न करत असून केवळ वाचक आणि प्रेक्षकांनाच नव्हे, तर गुंतवणूकदारांनाही समाधानी करत असल्याची प्रतिक्रिया TV 18 चे चेअरमन अदिल झैनुलभाई यांनी दिली आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: Money, Network18

    पुढील बातम्या