मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल?

EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल?

EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो.

EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो.

EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो.

मुंबई, 18 जानेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोरोना संकटाच्या (Corona Crises) काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पैसा नसतील तर फार काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यावर कर्ज (Loan on PF Account) घेऊ शकता किंवा कोविड-19 च्या उपचारासाठी घरी बसून पैसे काढू शकता.

EPFO ने ट्वीट केले आहे की EPFO ​​सदस्य त्यांच्या स्मार्टफोनद्वारे UMANG अॅप वापरून पैसे काढू शकतात. EPFO ने सांगितले की, या सोप्या स्टेप्स फॉलो करून, UMANG अॅपच्या मदतीने तुम्ही कोविड-19 अॅडव्हान्सच्या स्वरूपात पैसे काढू शकता. Umang हे सेंट्रलाईज्ड अॅप आहे. आधार, गॅस बुकिंगपासून अनेक सरकारी ई-सेवांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

कर्ज परत करण्याची गरज नाही

Umang अॅपद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढले, तर ते पुन्हा जमा करण्याची गरज नाही. हे कर्ज परत न करण्यायोग्य कर्ज असेल. या सुविधेमुळे ईपीएफओ सदस्यांना (EPFO Member) मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्ही ही रक्कम महामारीच्या काळात तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता.

क्रिप्टो टोकनचं जाळं; केवळ आठवडाभरात 1000 रुपये बनले 85 कोटी, मात्र तज्ज्ञ म्हणतात...

तुम्ही कोणत्या कामासाठी पैसे काढू शकता?

EPFO ने आपल्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यानुसार कोणताही ग्राहक वैद्यकीय उपचार, नवीन घर खरेदी, बांधकाम, नूतनीकरण, गृहकर्जाची परतफेड आणि लग्नाचा खर्च यासाठी पैसे काढू शकतो. घरासाठी जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकता. याशिवाय पती, पत्नी, पालक किंवा मुलांसाठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ग्राहक पैसे काढू शकतात. पैसे काढण्यासाठी लॉक-इन कालावधी किंवा किमान सेवा कालावधी यासारख्या अटी लागू आहेत.

कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न

Uamng अॅपद्वारे पैसे कसे काढाल?

>> तुमच्या स्मार्टफोनवर Umang अॅप डाउनलोड करून लॉग इन करा.

>> स्क्रीनवरील 'All Services' या पर्यायाखाली EPFO ​​विभागावर क्लिक करा.

>> ड्रॉप-डाउन वर जा आणि 'Claim' पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा EPFO ​​UAN टाइप करा.

>> यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.

>> तुम्हाला तुमच्या फोनवर एक रेफरन्स नंबर क्लेम मिळेल.

>> तुमच्या पैसे काढण्याच्या रिक्वेस्ट स्टेटस ट्रॅक करण्यासाठी तुम्ही हा नंबर वापरू शकता.

First published:

Tags: Epfo news, PF Withdrawal