अदोनी : इंग्रजांच्या काळापासून दुसरी मुंबई म्हणून आंध्र प्रदेशातील अदोनी हे गाव आहे. इथे जसं सोनं मिळावं तसं सोन्याच्या भावाने कापूस उत्पादन होतं आणि त्याला सोन्यासारखा भावही मिळतो. यंदा हा भाव सर्वोच्च स्तरावर पोहोचला. शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल अशी आशा होती. मात्र चक्रीवादळाने सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी केली. चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. इतकच नाही तर काही ठिकाणी नकली बीज पेरणीसाठी मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली. आता वर्ष संपत आल्याने शेतकऱ्यांच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. अवकाळी पावसाचं संकट आणि बनावट बियाण्यांमुळे पुन्हा एकदा भरपूर कमाई करण्याचं शेकऱ्यांची स्वप्न हवेत विरलं आणि रडू कोसळलं. News18 Local तेलगुने दिलेल्या वृत्तानुसार रायलसीमा जिल्ह्याचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र असलेल्या कुर्नूल जिल्ह्यातील अडोनी येथे कापसाकडे सोने म्हणून पाहिले जाते. यंदा शेतकऱ्यांनी छप्पार फाड कमाई केली.
क्रेडिट कार्ड वापरता सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतंवर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत कापसाचे दर क्विंटलमागे १२ हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले. हे दर गेल्या काही वर्षातील सर्वोच्च असल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. बरोबर एक वर्षापूर्वी कपाशीच्या किमती निम्म्याही नव्हत्या. अशा परिस्थितीत भावाने विक्रमी पातळी गाठल्यानंतर यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकावर मोठी बाजी मारली होती. आंध्र प्रदेशच्या या भागात यंदा भरपूर पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी कशीबशी पिकं वाचवली, पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं आहे.
लग्नसराईत सोन्याला आला भाव, तुमच्या जिल्ह्यात काय आहे दर? लगेच करा चेकयाशिवाय बनावट बियाणी विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक समितीने केली आहे. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी राज्य सरकारला करण्यात आली आहे.
काही आठवड्यांपूर्वी कापसाचे दर 9 हजार रुपये प्रति क्विंटल आले होते. आता 8500 वर भाव पोहोचला आहे. तर कमीत कमी कापसाला 5500 क्विंटलमागे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

)







