जाहिरात
मराठी बातम्या / मनी / औषधांचा खर्च कमी होणार? कर्करोग, मधुमेह रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता

औषधांचा खर्च कमी होणार? कर्करोग, मधुमेह रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता

औषधांचा खर्च कमी होणार? कर्करोग, मधुमेह रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता

केंद्र सरकार सामान्य आणि गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमतीत कपात करण्याचा विचार करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जुलै : वैद्यकीय खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. औषधांच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेकाची चिंता वाढली आहे. औषधांची विक्री किंमत आणि प्रोडक्शन खर्च यात मोठा फरक असल्याची ओरड आधीपासूनच आहे. मार्जिनच्या या खेळात सर्वसामान्य भरडला जातो. त्यामुळेच केंद्र सरकार सामान्य आणि गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमतीत कपात करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. याबाबत अधिकृत घोषणा 15 ऑगस्टला होऊ शकते. केंद्र सरकारने याबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना येत्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या आजारांशी संबंधित काही औषधांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे आजारापेक्षा उपचाराच्या खर्चाच रुग्णांना टेन्शन येतं. त्यामुळे याची किंमत नियंत्रित करायचा सरकारचा विचार आहे. दोन मुलं आणि पतीचं निधन, धीर न सोडता घरातच सुरु केली शाळा; द्रोपदी मुर्मू यांचा खडतर प्रेरणादायी प्रवास आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उद्या औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावल्याची माहिती आहे. अनेक औषधांवरील मार्जिन 1000 टक्क्यांहून अधिक आहे. सध्या, औषध नियामक NPPA ने 355 औषधांच्या किंमतीवर मर्यादा घातली आहे. या औषधांवर होलसेड ट्रेड मार्जिन 8 टक्के आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 16 टक्के आहे. या सर्वांवर विचार होऊन सरकार पुढील रणनिती तयार करण्याची शक्यता आहे. शिवसेनेची पुन्हा शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव, शिंदे म्हणाले… किंमती 70 टक्क्यांनी कमी होतील सरकारच्या या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास औषधांच्या किमती 70 टक्क्यांनी कमी होतील. विभाग आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत बदल करत आहे. 2015 मध्ये त्यात बदल करण्यात आला होता. यामध्ये, रुग्ण दीर्घकाळ वापरत असलेल्या औषधांच्या हाय मार्जिनवर मर्यादा घालण्याचा विचार केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात