मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोना लशीचा दुष्परिणाम झाला, तर रुग्णास मिळणार विम्याचं संरक्षण

कोरोना लशीचा दुष्परिणाम झाला, तर रुग्णास मिळणार विम्याचं संरक्षण

कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे (Corona Vaccine side effects) होणाऱ्या दुष्परिणामांसाठी विम्याचं कवच देण्याचा निर्णय दि जनरल इन्श्युरन्स कौन्सिलने (The Genral Insurance Council) IRDAI ला कळविला आहे.

नवी दिल्ली,26 जानेवारी : कोरोनाप्रतिबंधक लस (Coronavirus Vaccine) घेतल्यानंतर  त्याचा काही दुष्परिणाम झाला आणि रुग्णाला अस्वस्थ वाटू लागलं तर त्याच्या उपचारांचा खर्च आरोग्य विम्यात क्लेम करता येईल.  The General Insurance Council च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर त्याचा खर्च विम्याच्या रकमेतून वसूल करता येईल. अशा रुग्णांच्या उपचारांचा खर्च आरोग्य विम्यात (Health Insurance) समाविष्ट करण्यात येणार असल्याचे विमा उद्योगातील सूत्रांनी सांगितलं आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्यास रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, ही बाब आरोग्य विम्यात समाविष्ट करण्यात येईल, असा दावा एका नाॅन लाईफ इन्श्युरन्स कंपनीने केला आहे. आम्ही ही बाब नियमकांकडे स्पष्ट केली असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी विम्याचे कवच देण्याचा निर्णय दि जनरल इन्श्युरन्स कौन्सिलने (The Genral Insurance Council) इन्श्युरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट आॅथॅरिटी आफ इंडिया (आयआरडीएआय) ला कळविला आहे.

पाॅलिसीतील नियमित अटी विमाधारकाला लागू असतील, त्या व्यतिरिक्त लसीमुळे दुष्परिणाम झाल्यास किमान 24 तास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशी अट या आरोग्य विम्यासाठी आहे.

हे देखील वाचा - घातक कोरोनावर आता येणार औषध; Oxford च्या 'वंडर ड्रग'ने मृत्यूदर कमी होण्याची आशा

यापूर्वी आयआरडीएने विमा कंपन्यांना लशीची किंमत देखील भरण्यास सांगितलं होतं. या निर्णयास जनरल इन्श्युरन्स कौन्सिलने विरोध दर्शवला होता. ही बाब चुकीची असल्याचे कौन्सिलने स्पष्ट केल्याचे सीएनबीसी टीव्ही 18 च्या वृत्तात म्हटले आहे. कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaccine) या कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाबाबत असलेली भिती दूर करण्याचा अधिकारी प्रयत्न करीत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायराॅलाॅजी (National institute Of Virology) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेली ही भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid19, Health