मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

घातक कोरोनावर आता येणार औषध; Oxford च्या 'वंडर ड्रग'ने मृत्यूदर कमी होण्याची आशा

घातक कोरोनावर आता येणार औषध; Oxford च्या 'वंडर ड्रग'ने मृत्यूदर कमी होण्याची आशा

covid 19 मुळे होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी एका औषधाची चाचणी घेण्याचं नियोजन शास्त्रज्ञ करत आहेत. त्यामुळे, लवकरच मृत्यूदराचे (corona death rate) प्रमाण कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली, 25 जानेवारी:  कोरोनाव्हायरवरच्या (Covid-19) लशीपाठोपाठ आता कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठीचं औषध निर्माण येणार आहे. या औषधामुळे कोरोना मृत्यूचा दर (Death Rate) कमी होण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील (Oxford University) शास्त्रज्ञ एका 'वंडर ड्रग'ची (Wonder Drug) निर्मिती करत आहेत. या औषधाची व्यापक पातळीवरील चाचणी (Test) घेण्याचं नियोजन करत आहेत. या औषधामुळे कोविड-19चा मृत्यूदर जागतिक पातळीवर कमी करण्यात यश येऊ शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्तही आहे आणि घरगुती पातळी 'दी टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की अनेकांनी या औषधाला 'वंडर ड्रग' असं म्हटलं असलं, तरी त्याचं पुरेसं परीक्षण अद्याप झालेलं नाही. या औषधांत आयव्हरमेक्टिनचा (Ivermectin) समावेश आहे. त्या औषधाचा उपयोग प्रामुख्याने परजीवी जंतांचा (Parasitic Worms) प्रादुर्भाव झालेली जनावरं आणि माणसांवर केला जातो, असंही त्या वृत्तात म्हटलं आहे. रुग्णामध्ये लक्षणं दिसल्यानंतर घरच्या घरीच लवकर उपचार करता यावेत आणि रोगाचं रूप गंभीर होण्यापासून प्रतिबंध करावा, यासाठी ही चाचणी घेतली जाणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्रायमरी केअर विषयाचे प्राध्यापक ख्रिस बटलर यांनी सांगितलं, की या औषधामध्ये विषाणूला प्रतिकार करण्याची, तसंच दाह कमी करण्याची चांगली क्षमता आहे. मात्र, त्याबद्दलच्या माहितीत तफावत आहे. या औषधाची अद्याप कसून चाचणी घेण्यात आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, याउलट मत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) व्यक्त केलं आहे. तयांच्या मते, या औषधाचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. हे वाचा  - आता Tata उतरणार कोरोना लसीकरण मोहिमेत; भारतात तिसरी Covid लस आणायची तयारी सुरू हे औषध पेशीच्या केंद्रकामध्ये प्रथिनाच्या समावेशाला प्रतिबंध करतं. त्यामुळे विषाणूची पुनरुत्पादन क्षमता कमी होते. इस्टर्न व्हर्जिनिया मेडिकल स्कूलचे पॉल मारिक यांनी सांगितलं, की 'या औषधामुळे दिवसाला हजारो व्यक्तींचे प्राण वाचू शकतील. मेक्सिको, भारत, दक्षिण अमेरिका या देशांमध्ये मृत्युदर कमी झाला असल्याचं दिसून आलं आहे.' ब्रिटनमध्ये त्वचेवरील संसर्ग आणि दाह यांसाठी या औषधाला मान्यता मिळालेली आहे. हे वाचा - Good News : कोरोना व्हायरस रोखणारा ‘नेजल स्प्रे’ तयार, लवकरच बाजारात येणार! अरब न्यूजच्या वृत्तानुसार, या औषधाची चाचणी 65 वर्षांवरील नागरिक, प्रकृती नाजूक असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांच्यावर जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमातून, तसंच ऑनलाइन आणि ब्रिटनच्या एनएचएस टेस्ट अँड ट्रेस सिस्टीमद्वारे घेतली जाणार आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या