Home /News /money /

लॉकडाऊन 2 नंतर 8 तासांची शिफ्ट वाढवण्याची शक्यता, कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू

लॉकडाऊन 2 नंतर 8 तासांची शिफ्ट वाढवण्याची शक्यता, कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू

लॉकडाऊन - 2 संपताच कामाच्या तासांमध्ये सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल : नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात अधिक तास  (Office Hours May Extended) काम करण्याची तयारी करावी लागू शकते. कारण सरकार (Government of India) दिवसाची 8 तासांची शिफ्ट वाढवून 12 तासांची करण्याचा विचार करीत आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू केलेल्या लॉक़डाऊन 2 नंतर (Lockdown Part 2) हा बदल केला जाऊ शकतो. कोरोना (Covid - 19) व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत मजुरांची (Worker) संख्या कमी झाली आहे. दैंनदिन वस्तूंची मागणी मात्र जलद गतीने वाढत आहे. यासाठी सरकारन कामामध्ये काही बदल करू शकते. यामुळे 1948 या कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. पुढील पाऊल काय असेल इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार नवीन अध्यादेश राज्य सरकारांना प्रतिष्ठांनामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढविण्यासंदर्भात सूट देतील. कायद्यातील नव्या बदलामुळे कंपन्यांना शिफ्ट वाढविण्याचा अधिकार मिळेल. सध्या 8 तासांची शिफ्ट असते. आठवड्यात 6 दिवस (48 तास) कोणाकडून तरी काम करवून घेतले जाईल, जर या प्रस्तावावर निर्णय झाल्यास रोजची शिफ्ट 12 तासांची होईल. आठवड्यातील 6 दिवस (72 तास) परवानगी असेल. यासाठी 1948 च्या कारखाना अधिनियम याचा अभ्यास करावा लागेल. सध्या 1948 कायद्याच्या अधिनियमाअंतर्गत 51 कलमानुसार कोणत्याही वयस्कर व्यक्तीला कोणत्याही कारखान्यात काम करण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. शिवाय कोणत्याही आठवड्यात कामगारांकडून 48 तासांहून अधिक काम करवून घेतलं जाऊ शकत नाही. याची आवश्यकता का? इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीत पुढे लिहिलं आहे की, Employer Organizations and Industry यांनी सरकारकडे मजुरांच्या कामाचे तास वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर मनुष्यबळाची कमतरता असतानाही काम करवून घेता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या अनेक मजूर कसेबसे आपल्या घरी गेले आहेत, मात्र सध्या ते कामावर रुजू होऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेतील प्रक्रिया सुरू करण्याच्या सरकारच्या योजनेनंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोमवारपासून आपल्या संबंधित कार्यालयातून काम पुन्हा सुरू केले आहे. संबंधित - लॉकडाऊनमुळे घरी जायला मिळालं नाही; सडलेल्या अवस्थेत मिळाला मजुराचा मृतदेह मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांचे PM Cares ला 3100 रु. दान संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या