जाहिरात
मराठी बातम्या / देश / मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांनी PM Cares मध्ये केले 3100 रु. दान

मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांनी PM Cares मध्ये केले 3100 रु. दान

मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांनी PM Cares मध्ये केले 3100 रु. दान

मंदिराजवळ बसून मिळालेल्या पैशातून हे कुष्ठरोग व दिव्यांग आपली गुजराण करतात. या 50 जणांनी कोरोनाच्या लढ्यासाठी पुढे येऊन मदत केली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

वाराणसी, 14 एप्रिल : संपूर्ण देश कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढाईत सहभागी झाला आहे. श्रीमंत असो वा गरीब सर्वजण आपआपल्या परीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाराणसी येथील दिव्यांग आणि कुष्ठ रोग्यांना भीक म्हणून मिळालेले 3100 रुपये त्यांनी प्रधानमंत्री केअरमध्ये दान केले आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी जनतेला कोरोनाच्या लढ्यात सहकार्य करण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अगदी उद्योगपती, कलाकारांपासून सर्वसामान्य नोकरदारवर्गानेही आपल्याला शक्य तेवढ्या पैशांची मदत केली. वाराणसी येथील संकट मोचन मंदिर येथे विश्वनाथ कुष्ठ आश्रममध्ये राहणाऱ्या 35 कुटुंबात 50 सदस्य पुढे आले आहेत. हे मंदिराजवळ बसून भीक मागतात आणि आपली गुजराण करतात. कोरोनाच्या लढ्यात मोदींना मदत करण्यासाठी कोणी 50 तर कोणी 20 रुपदे देऊन आपले मदत नोंदवली आहे. त्यांनी एकूण 3100 रुपये दान केले आहे. यामध्ये दिव्यांग, कुष्ठरोगांचा सहभाग आहे. यांनी दिव्यांग कल्याण सल्लागार बोर्डाचे सदस्य डॉक्टर उत्तम ओझा यांच्याशी संपर्क करुन या कुष्ठ रोगींनी स्टेट बँकेच्या माध्यमातून पैसे पीएम केअर्समध्ये पाठविले. सध्या देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल 10000 पर्यंत पोहोचली आहे. त्यातही मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या लढ्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी दिवस-रात्र एक करुन काम करीत आहेत. देशातील वैद्यकीय सुविधा आणि लॉकडाऊनमध्ये हाल सोसणाऱ्यांना या निधीची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडे मदतीचे आवाहन केले होते. देशभरातून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संबंधित - आधी देशाची सेवा मग आपलं लग्न! पोलीस नवरदेव आणि डॉक्टर नवरीने लग्नसोहळाच थांबवला कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये ‘सिंघम’ची एण्ट्री, 2 पोलीस कर्मचाऱ्यांना दिला दणका

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात