Home /News /national /

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे घरी जायला मिळालं नाही; सडलेल्या अवस्थेत मिळाला 24 वर्षांच्या मजुराचा मृतदेह

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे घरी जायला मिळालं नाही; सडलेल्या अवस्थेत मिळाला 24 वर्षांच्या मजुराचा मृतदेह

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आत्महत्या करण्यापूर्वीच त्याचे कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. त्यांनीही तरुणाची समजूत काढली होती.

    हैद्राबाद, 14 एप्रिल : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लॉकडाऊन – 2 (Lockdown - 2) ची घोषणा केली आहे. मे महिन्याच्या 3 तारखेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी हे आवश्यक आहे. मात्र यामुळे  विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना कुटुंबीयांपासून दूर राहणे अवघड जात आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हैद्राबाद येथील एका स्थलांतरित मजुराने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी जाता येत नसल्याने मजूर नाराज असल्याचे पोलिसांनी सांगितले. हैद्राबाद (Hydrabad) येथील उप्पल भागात 24 वर्षीय मजुराने (Worker) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरी जाता येत नसल्याने तो नाराज होता. त्याचा रुममेट 13 मार्च रोजी आपल्या गावी बिहार येथे निघून गेला. त्यानंतर मात्र त्याला  एकटं वाटत होतं. याशिवाय कुटुंबीयांपासून लांब राहावे लागत असल्याने त्याला मानसिक ताण सहन करावा लागत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे कुटुंबीयांशी फोनवर बोलणं झालं होतं. मला घरी यायचंय मात्र लॉकडाऊनमुळे मी इथे अडकल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली आणि गरज असल्यास पैसे पाठवतो असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. सोमवारी पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. लॉकडाऊनदरम्यान आत्महत्येच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. संबंधित - मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांचे PM Cares ला 3100 रु. दान आधी देशाची सेवा मग आपलं लग्न! पोलीस नवरदेव आणि डॉक्टर नवरीने लग्नसोहळाच थांबवला
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या