मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paints Price Hike : घराला रंग देणेही महागणार; रंगाच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा कंपन्यांचा निर्णय

Paints Price Hike : घराला रंग देणेही महागणार; रंगाच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा कंपन्यांचा निर्णय

Asian Paints दिवाळीनंतर किमती वाढवत आहेत. 2008 नंतर एकाच वेळी पेंट्सच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

Asian Paints दिवाळीनंतर किमती वाढवत आहेत. 2008 नंतर एकाच वेळी पेंट्सच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

Asian Paints दिवाळीनंतर किमती वाढवत आहेत. 2008 नंतर एकाच वेळी पेंट्सच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 ऑक्टोबर : दिवाळी (Diwali Festival 2021)काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच जण तयारील लागले आहेत. घरातील साफसफाई, रंगरंगोटी सगळीकडेच सुरु आहे. मात्र वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महागाईच्या तडाख्याने सामान्य माणूस आधीच हैराण झाला आहे. आता घराची रंगरंगोटीही महाग होणार आहे. रंग उत्पादक कंपन्यांनी रंगाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एशियन पेंट्स (Asian Paints) आणि बर्जर पेंट्सने (Berger Paints) दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरपासून पेंट्सच्या किमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढणार आहेत.

पेंट्सच्या किमतीत सर्वाधिक वाढ

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पेंट कंपन्यांनी केलेली दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे मानली जात आहे. त्यामुळे इतर पेंट कंपन्या देखील लवकरच किंमत वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. एशियन पेंट्सने इनॅमल्सच्या किमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तर इतर सर्व पेंट्सच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. मात्र एशियन पेंट्स दिवाळीनंतर किमती वाढवत आहेत. 2008 नंतर एकाच वेळी पेंट्सच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

कच्च्या तेलाच्या किंमत वाढल्याने निर्णय

गेल्या वर्षभरात पेंट्स कंपन्यांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली होती. इतर कच्च्या मालाच्या किमती वाढण्याबरोबरच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने या कंपन्यांच्या खर्चातही वाढ झाली होती. Asian Paints चे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक अमित सिंगल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला Q2 च्या निकालांचा अहवाल दिल्यानंतर गुंतवणूकदारांना संबोधित करताना सांगितले होते की, या कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीपासूनच कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे मार्जिनवर परिणाम झाला आहे.

Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज

मात्र, बाजारातील तज्ज्ञांसह अनेक ब्रोकरेज हाऊसेसचे मत आहे की, मार्जिन कमी करण्यासाठी पेंट्स कंपन्यांना किमतीत आणखी 5 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. मात्र सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत.

First published:

Tags: Asian paints, Money, Price