Home /News /money /

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, कमर्शियल LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, कमर्शियल LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल 43.5 रुपयांची मोठी वाढ केली आहे.

  नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल 43.5 रुपयांची मोठी वाढ केली आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण महाग होऊ शकतं. इंडियन ऑईल वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलो कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपये इतका झाला आहे. आधी याच सिलेंडरची किंमत 1693 रुपये होती. कोलकातामध्ये 19 किलो कमर्शियल सिलेंडरची किंमत 1805.5 रुपये झाली आहे. आधी ही किंमत 1770.5 रुपये होती. घरगुती 14. 2 किलो सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने काहीसा दिलसा देण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. घरगुती गॅसवर दिलासा - याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरचा दर वाढून 884.50 रुपये झाला. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. या घरगुती सिलेंडर दरात या महिन्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

  सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ऑक्टोबरपासून वाढणार CNG-PNG च्या किंमती?

  दरम्यान, एकीकडे कोरोना, लॉकडाउनचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला असताना आता पेट्रोल-डिझेल दरवाढ, LPG Gas दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. असं असतानाच आता CNG आणि PNG दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ही वाढ होण्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नॅच्युरल गॅसच्या किंमतीत 60 ते 70 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ डॉलरमधील आहे. त्यानुसार भारतीय बाजारात, CNG आणि PNG दरात 10 ते 15 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gas, LPG Price

  पुढील बातम्या