• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Petrol Price: याठिकाणी केवळ 1 रुपया 46 पैशांत मिळतंय एक लीटर पेट्रोल, वाचा काय आहे कारण

Petrol Price: याठिकाणी केवळ 1 रुपया 46 पैशांत मिळतंय एक लीटर पेट्रोल, वाचा काय आहे कारण

Petrol Price: सध्या पेट्रोल-डिझेलचे दर आसमंताला भिडले आहे. भारतातील अनेक शहरातील पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 जून: सध्या पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike) आसमंताला भिडले आहे. भारतातील अनेक शहरातील पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मात्र जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. अनेक देशात अत्यल्प दराने पेट्रोलची विक्री होत आहे. अशावेळी जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल कुठे मिळत असेल? शिवाय असे कोणते देश आहेत जिथे भारतापेक्षाही जास्त दराने पेट्रोल मिळतं आहे आणि भारताच्या शेजारी देशात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत. सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? पेट्रोलच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये मिळतं. याठिकाणी पेट्रोलची किंमत 1.46 रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर इराण आहे, याठिकाणी पेट्रोलची किंमत 4.24 रुपये आहे. अंगोलामध्ये पेट्रोल 17.88 रुपये प्रति लीटर आहे. हे असे तीन देश आहेत ज्याठिकाणी सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. याठिकाणी पेट्रोलची किंमत भारतातील एक लीटर पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी आहे. एवढ्या स्वस्त दरात का मिळतं व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल? व्हेनेझुएला असा देश आहे ज्याठिकाणी सर्वात स्वस्त पेट्रोल उपलब्ध आहे. आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल स्वस्त यासाठी आहे कारण याठिकाणी पृथ्वीवरील सर्वात मोठं तेलभांडार आहे. देशातील आर्थिक घडी बिघडल्यानंतरही याठिकाणी सरकारकडून इंधनावर सब्सिडी देण्यात येते. सर्वात महाग पेट्रोलची विक्री कुठे होते? ग्लोबल पेट्रोल डीजल प्राइस डॉट कॉमने या पेट्रोलच्या दरांबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी उपलब्ध माहितीनुसार हाँगकाँगमध्ये पेट्रोलचे दर 169.21 रुपये प्रति लीटर, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरियामध्ये 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये, नॉर्वेमध्ये 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर 133.90 रुपये आहे. इंग्लंडमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 116 रुपये, स्वित्झर्लंडमध्ये दर 115 रुपये, जर्मनीमध्ये 116 रुपये, जपानमध्ये 93.62 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 68.91 रुपये आणि अमेरिकेत दर प्रति लीटर 50.13 रुपये आहेत. ज्या देशात सर्वात महाग पेट्रोलची विक्री होते अशा यादीमध्ये भारताचा क्रमांक 58वा आहे.
  First published: