जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update: सेन्सेक्स 571 अंकांनी खाली, निफ्टी 17150 वर; ऑटो, पॉवर, बँक, रिअल्टी शेअर टॉप लूजर

Share Market Update: सेन्सेक्स 571 अंकांनी खाली, निफ्टी 17150 वर; ऑटो, पॉवर, बँक, रिअल्टी शेअर टॉप लूजर

Share Market Update: सेन्सेक्स 571 अंकांनी खाली, निफ्टी 17150 वर; ऑटो, पॉवर, बँक, रिअल्टी शेअर टॉप लूजर

शेवटी सेन्सेक्स 571.44 अंकांनी म्हणजेच 0.99 टक्क्यांनी घसरून 57,292.49 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 169.45 अंकांनी किंवा 0.98 टक्क्यांनी घसरून 17,117.60 वर बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. अस्थिरतेनंतर बाजार लाल चिन्हात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 571.44 अंकांनी म्हणजेच 0.99 टक्क्यांनी घसरून 57,292.49 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 169.45 अंकांनी किंवा 0.98 टक्क्यांनी घसरून 17,117.60 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या 30 पैकी 26 शेअर घसरले तर निफ्टीच्या 50 पैकी 40 शेअर्सची विक्री झाली. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व राहिले. आजच्या व्यवहारात बँकिंग, FMCG, पॉवर शेअर्सची विक्री झाली. दुसरीकडे मेटल शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. दरम्यान, मेटल निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाला. मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 1047 अंकांनी वधारला शेवटच्या सत्रात म्हणजे होळीच्या एक दिवस आधी, BSE सेन्सेक्स 1,047.28 अंकांनी किंवा 1.84 टक्क्यांनी वाढून 57,863.93 अंकांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे निफ्टी 311.70 अंकांनी म्हणजेच 1.84 टक्क्यांनी वाढून 17,287.05 अंकांवर बंद झाला. GST दर रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता, 12 आणि 18 टक्क्यांचा मिळून एकच 15 टक्क्यांचा स्लॅब येणार निफ्टीचे टॉप लूजर्स आणि टॉप गेनर्स शेअर निफ्टीमधील टॉप लूजर्स शेअरमध्ये Grasim Ind, Britannia Ind, Tata Consumer आणि Tata Consumer यांचा समावेश आहे. तर टॉप गेनर्स शेअर लिस्टमध्ये Coal India, Hindalco Ind, UPL Ltd आणि ONGC यांचा समावेश आहे. Multibagger Stocks: बंपर रिटर्न; 52 दिवसात 44 रुपयांचा ‘हा’ शेअर 530 रुपयांवर पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण सुरुच पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी One 97 Communications च्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. सोमवारी पेटीएमचे शेअर्स 5.36 टक्क्यांनी घसरून 565.05 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मात्र पेटीएमच्या गुंतवणूकदारांना अद्याप दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. येत्या काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात