मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याचांदीचे भाव उतरले, खरेदी करण्यापूर्वी इथे तपासा लेटेस्ट दर

Gold Price Today: सोन्याचांदीचे भाव उतरले, खरेदी करण्यापूर्वी इथे तपासा लेटेस्ट दर

Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchnage) गुरुवारी सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी: सोन्याचांदीच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchnage) गुरुवारी फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोन्याचे भाव 350 रुपये प्रति तोळाने कमी होऊन  47,400 रुपयांवर ट्रेड करत होते. याशियाव सिल्ह्वर फ्यूचरमध्ये 836.00 रुपयांची घसरण झाली असून यामुळे चांदीचे भाव 67,729.00 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत. बजेटमध्ये (Budget 2021) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होत आहे. गुंतवणूकदार नफा कमावत आहेत, परिणामी सोन्याचांदीच्या किंमतीही कमी होत आहेत.

दिल्लीमध्ये सोन्याचांदीचे भाव (Gold- Silver Price Today in Delhi on 4th Feburary 2021)

-22 कॅरेट सोन्याचे दर: 46890 रुपये प्रति तोळा

-24 कॅरेट सोन्याचे दर: 51150 रुपये प्रति तोळा

-चांदीचे दर: 68500 रुपये प्रति किलो

काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहेत दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्य दरात घसरण जारी आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 10.89 डॉलरने कमी होऊन 1,823.34 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.30 डॉलरने कमी होऊन 26.5 डॉलर झाले आहेत.

बुधवारी सराफा बाजारात काय होते दर?

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळा 232 रुपयांनी कमी झाले होते. यानंतर याठिकाणी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 47,387 रुपये प्रति तोळा झाले होते. तर चांदीचे भाव देखील 1,955 रुपये प्रति किलोने कमी होऊन 67,605 रुपयांवर पोहोचले होते.

5 टक्क्याने कमी झालं आयात शुल्क

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे जाहीर केले की, सोन्याचांदीवरील आयात शुल्क (import tax) घटवण्यात येत आहे. सोन्याचांदीवरील आयात शुल्क 5 टक्क्याने घटवले आहे. सध्या सोन्याचांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे, या कपातीच्या निर्णयानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे आणखी काही प्रमाणात सोन्याचांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today