मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan : घर घेण्यासाठी होम लोन करताय? कोणती बँक सर्वात स्वस्त लोन देते चेक करा

Home Loan : घर घेण्यासाठी होम लोन करताय? कोणती बँक सर्वात स्वस्त लोन देते चेक करा

घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की देशातील कोणती बँक गृहकर्जावर किती व्याज आकारते. कमी व्याजदर असणाऱ्या बँकांवर नजर टाकूया.

    मुंबई, 5 डिसेंबर : कोरोना काळात रिअल इस्टेट सेक्टरला मोठा फटका बसला खोलवर परिणाम झाला होता, मात्र आता या क्षेत्रातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की देशातील कोणती बँक गृहकर्जावर किती व्याज आकारते. कमी व्याजदर असणाऱ्या बँकांवर नजर टाकूया. युनियन बँक (Union Bank) युनियन बँक नोकरी करणाऱ्यांना 6.40 टक्के सुरुवातीच्या व्याजदरासह गृहकर्ज देत आहे. दुसरीकडे, स्वयंरोजगार असलेल्या लोकांना सुरुवातीच्या 6.50 टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. बँकेच्या मते परवडणाऱ्या दरात गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर 800 पेक्षा कमी असावा. याशिवाय उत्पन्नात सातत्य असावे. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) बँक ऑफ बडोदाकडून गृहकर्ज हवे असेल तर तिथून तुम्हाला सुरुवातीच्या 6.50 टक्के दराने गृहकर्ज मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना 6.50 टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध होईल. 10 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज बँकेमार्फत दिले जाते. Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही बँक ऑफ इंडिया (Bank Of India) तुमचा CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला 6.50 टक्के दराने गृहकर्ज दिले जाते. यासह, बँक कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के प्रक्रिया शुल्क देखील आकारते, जे किमान 1500 रुपये आणि कमाल 20 हजार रुपये असेल. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) विशेष ऑफर अंतर्गत, कोटक महिंद्रा बँक 10 डिसेंबरपर्यंत गृहकर्ज घेणार्‍यांना 6.55 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी 6.6 टक्के प्रारंभिक व्याजदराने कर्ज देत आहे. Investment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय? 'या' स्ट्रॅटेजीचा वापर करा आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) तुम्ही ICICI बँकेद्वारे गृहकर्ज घेतल्यास, ते तुम्हाला 6.70 टक्के सुरुवातीच्याा दराने गृहकर्ज देत आहे. त्याच वेळी, स्वतःचा व्यवसाय सुरू करणार्‍या लोकांना 6.6 टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Home Loan, Investment

    पुढील बातम्या