मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही

Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही

FD मध्ये गुंतवणूक करताना कार्यकाळाचा काळजीपूर्वक विचार करा. लक्षात ठेवा की मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडण्यासाठी दंड आहेत. यामुळे ठेवीवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 डिसेंबर : भविष्याचं नियोजन (Future Planning) करताना गुंतवणूक खुप फायदेशीर ठरते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) उपलब्ध आहेत, मात्र मुदत ठेव (Fix Deposit) हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळत असल्याने लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जेव्हा तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करता तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आज माहिती घेऊयात.

कार्यकाळाची निवड (Tenure)

एफडीमध्ये गुंतवणूक करताना कार्यकाळाचा काळजीपूर्वक विचार करा. लक्षात ठेवा की मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडण्यासाठी दंड आहेत. यामुळे ठेवीवर मिळणारे एकूण व्याज कमी होऊ शकते.

31 डिसेंबरआधी 'हे; काम करुन घ्या, अन्यथा 5 हजारांचा दंड भरावा लागेल

वेगवेगळ्या एफडीमध्ये पैसे गुंतवा

संपूर्ण पैसे एका एफडीमध्ये गुंतवू नयेत. तुम्हाला एफडीमध्ये 5 लाखांची गुंतवणूक करायची असेल, तर एकापेक्षा जास्त बँकांमध्ये 1 लाखाच्या पाच एफडी करु शकता. जेणेकरून जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा तुमच्या गरजेनुसार तुम्ही एक FD मोडून पैसे काढू शकता. यामुळे तुमची उर्वरित एफडी सुरक्षित राहील.

FD वर मिळणाऱ्या व्याजावर कर

एफडीमधून मिळणाऱ्या व्याजावर आयकर स्लॅबनुसार कर आकारला जातो. एखाद्या आर्थिक वर्षात FD वर मिळणारे व्याज 10,000 पेक्षा जास्त असेल तर TDS डिडक्शन होईल. हे एकूण मिळणाऱ्या व्याजाच्या 10 टक्के असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार आहे. तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास FD वर TDS कपात करण्यास परवानगी न देण्यासाठी फॉर्म 15G आणि फॉर्म 15H बँकेकडे सबमिट केले जाऊ शकते.

शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस

व्याज

यापूर्वी बँकांना त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता. काही बँका आता मासिक पैसे काढण्याचा पर्याय देखील देत आहेत.

First published:

Tags: Fixed Deposit, Investment, Money