मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय? 'या' स्ट्रॅटेजीचा वापर करा

Investment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय? 'या' स्ट्रॅटेजीचा वापर करा

    मुंबई. 5 डिसेंबर : कोरोना महामारीनंतर (Corona Crises) भारतात गुंतवणुकीची क्रेझ वाढली आहे. आता लोक जुन्या गुंतवणूक पर्यायांतून (Investment Options) बाहेर पडत आहेत आणि त्यांचे पैसे स्टॉक, क्रिप्टो आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवत आहेत. हे गुंतवणुकीचे पर्याय निश्चितपणे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत, परंतु त्यावरील परतावा देखील खूप चांगला आहे. कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी आली आहे. त्यामुळे शेअर बाजार (Share MArket) आणि म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवलेल्या पैशावर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मात्र भारतात अजूनही असे बरेच लोक आहेत जे या मार्गाने गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. मात्र चांगली रणनिती आखली तर म्युच्युअल फंडातून जबरदस्त पैसे कमवता येऊ शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. म्युच्युअल फंडात पॅसिव्ह स्ट्रॅटेजीद्वारे गुंतवणूक करा तुम्हाला म्युच्युअल फंडातून चांगली कमाई करायची असेल, तर तुम्ही पॅसिव्ह स्ट्रॅटेजीद्वारे इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. बर्‍याचदा अनेक गुंतवणूकदार त्यांचे जास्त पैसे अशा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवतात ज्यांनी गेल्या काही वर्षांत जास्त परतावा दिला आहे. ही चूक तुम्ही कधीही करू नये. अशा म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे तुम्हाला दीर्घकाळात जास्त परतावा देऊ शकत नाहीत. Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा (Long Term Investment) चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी. बहुतेकदा आपल्यापैकी बहुतेक जण आपले पैसे म्युच्युअल फंडात अल्प मुदतीसाठी गुंतवतात. दीर्घ मुदतीनंतर जेवढा परतावा मिळतो तेवढा अल्प मुदतीत मिळत नाही. 31 डिसेंबरआधी 'हे; काम करुन घ्या, अन्यथा 5 हजारांचा दंड भरावा लागेल भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन गुंतवणूक करा भविष्यात जग कसे बदलणार आहे आणि त्या बदलात कोणत्या प्रकारची बाजारपेठ उभी राहण्याची संधी मिळेल हे पाहून गुंतवणूक करा. हा संदर्भ पाहता तुम्ही गुंतवणूक करावी. यात तुम्ही तंत्रज्ञानाशी संबंधित म्युच्युअल फंड खरेदी करू शकता. त्याचा तुम्हाला दीर्घकाळात खूप फायदा होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Mutual Funds

    पुढील बातम्या