जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बदलला आहे या बँकेचा पत्ता, याठिकाणी तुमचं खातं आहे का?

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बदलला आहे या बँकेचा पत्ता, याठिकाणी तुमचं खातं आहे का?

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बदलला आहे या बँकेचा पत्ता, याठिकाणी तुमचं खातं आहे का?

कॅनरा बँकेच्या (Canara Bank) काही शाखा मर्ज झाल्या आहेत. बँकेच्या विलिनीकरणानंतर बँकेचा पत्ता आणि IFSC कोड बदलला आहे. त्यामुळे बँकेचा नवा पत्ता जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून: बँक ग्राहकांसाठी (Bank Customer) महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही या महत्त्वाच्या बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कॅनरा बँकेच्या (Canara Bank) विलिनीकरणानंतर काही शाखा देखील मर्ज करण्यात आल्या आहेत. बँकेच्या विलिनीकरणानंतर बँकेचा पत्ता आणि IFSC कोड बदलला आहे. त्यामुळे बँकेचा नवा पत्ता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला कॅनरा बँकेशी संबंधित कामासाठी दुसऱ्या शाखेमध्ये जावं लागण्याची शक्यता आहे. कॅनरा बँकेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बँक मुंबईतील काही शाखा शिफ्ट करत आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की बँकेने एकूण 7 शाखांना शिफ्ट केले आहे. यामध्ये मालाड, मुंबई सेंट्रल, घाटकोपर इत्यादी ठिकाणच्या बँक शाखांचा समावेश आहे. तुम्हाला नवीन ब्रँचच्या बाबतीत जुन्या बँक ऑफिसमध्ये माहिती मिळू शकते. ग्राहकांवर काय होणार परिणाम? बँकेच्या मर्जरनंतर बँक ग्राहकांचा पत्ता आणि आयएफएससी कोडमध्ये बदल होईल. याचा परिणाम तुमच्या खात्यावर होणार नाही, तुमचा खाते क्रमांक जुनाच राहील. याशिवाय तुमच्या एमआयसीआर कोडमध्ये बदल होईल. हे वाचा- मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर अपडेट करा हे डिटेल्स IFSC कोड बदलल्यानंतर तुम्हाला हे डिटेल्स सर्वत्र अपडेट करावे लागतील. तुम्ही ज्याठिकाणाहून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करता किंवा बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करता त्याठिकाणी तुम्हाला हा कोड बदलणं आवश्यक आहे. तसं न केल्यास तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होऊ शकतो. हे वाचा- पुण्यातल्या या 3 बँकांनी मोडले नियम, RBI ने ठोठावला 23 लाखांचा दंड बदलावं लागेल चेकबुक IFSC Code अपडेट करण्यासह तुम्हाला तुमचं जुनं चेकबुक देखील बँकेत द्यावे लागेल आणि त्याठिकाणी तुम्हाला नवं चेकबुक इश्यू करावं लागेल. नवीन चेकबुक तुम्हाला नव्या आयएफएससी कोडसह मिळेल. तुम्ही जुन्या ब्रँचमधून याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता. शिवाय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देखील ही माहिती मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात