पुण्यातल्या या 3 बँकांनी मोडले नियम, RBI ने ठोठावला 23 लाखांचा दंड

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणं पुणे जिल्ह्यातल्या 3 सहकारी बँकांना चांगलंच महागात पडलं आहे. तीन बँकांवर मिळून 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणं पुणे जिल्ह्यातल्या 3 सहकारी बँकांना चांगलंच महागात पडलं आहे. तीन बँकांवर मिळून 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • Share this:
    पुणे, 22 जून : नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) तीन सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या तीन बँकांवर मिळून 23 लाख रुपयांचा दंड (Fine of 23 lakh) ठोठावण्यात आला आहे. यामध्ये मोगवीरा सहकारी बँक (The Mogaveera Co-op Bank Ltd.), इंदापूर अर्बन सहकारी बँक (Indapur Co-operative Bank ltd.) आणि बारामती सहकारी बँकेचा (Baramati Co-op Bank Ltd.) समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक दंड मोगविरा सहकारी बँकेवर आकारण्यात आलाय. मोगवीरा सहकारी बँकेवर 12 लाख रुपयांचा, इंदापूर सहकारी बँकेवर 10 लाखांचा तर बारामती सहकारी बँकेवर 1 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावलाय. या बँकांनी वेगवेगळ्या प्रकारे नियमांचं उल्लंघन केलं असून अधिक गंभीर उल्लंघनासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जादा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे. मोगवीरा बँकेचं काय चुकलं? या बँकेनं मुख्यतः तीन बाबींचं उल्लंघन केल्याचं आरबीआयनं म्हटलंय. डिपॉजिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस (DEA) फंडामध्ये पूर्ण हक्क भरलेली रक्कम हस्तांतरित करणं कायद्यानं बंधनकारक असतं. मात्र ही रक्कम बँकेनं हस्तांतरितच केली नसल्याचं स्पष्ट झालंय. दुसरं म्हणजे निष्क्रिय खात्यांबाबत बँकेनं काहीच हालचाली केल्या नाहीत. या खात्यांचा वार्षिक आढावाही घेण्यात आला नसल्याचं सिद्ध झालं. तर बँकेतील प्रत्येक खात्याच्या जोखणीचा आढावा घेणारी एक यंत्रणा तयार करणं बंधनकारक असताना तशी कुठलीही यंत्रणा उभी केली नसल्याचा आरोप या बँकेवर आहे. इंदापूर बँकेच्या कामातही अनेक चुका पुण्याच्या इंदापूर अर्बन सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेला दिलेल्या माहितीतून नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं. 31 मार्च 2019 पर्यंत बँकेनं एकूण असुरक्षित आगाऊ कमाल मर्यादेच्या अटीचं उल्लंघन केल्याचं तपास अहवालातून समोर आलं आहे. शिवाय जोखमीच्या वर्गवारीचा आढावा घेण्यासाठी बँकेनं काहीच उपाययोजना केल्या नसल्याचं स्पष्ट झालंय. एखाद्या ग्राहकाची जोखमीची मर्यादा किती आहे, हे ठरवण्याची कुठलीही यंत्रणा नसताना मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात आल्याचा ठपकाही बँकेवर ठेवण्यात आला आहे. हे वाचा - एअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ बारामती बँकेला ‘ही’ चूक भोवली या बँकेनं दुसऱ्या बँकेसोबत व्यवहार करताना प्रुडेन्शिअल इंटरबँक एक्सपोजर मर्यादेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या मर्यादेच्या उल्लंघनामुळे बारामती बँकेवर 1 लाख रुपयांच्या दंडाची कारवाई झालीय. ग्राहकांचं काय? या कारवाईचा ग्राहकांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. या बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कुठल्याही करारावर किंवा व्यवहारावर याचा परिणाम होणार नाही. यापूर्वी केलेले आणि भविष्यात केले जाणारे व्यवहार हे वैधच असणार आहेत.
    Published by:Amol Joshi
    First published: