मराठी बातम्या /बातम्या /मनी /

CNG Cars: सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' कार आहेत बेस्ट ऑप्शन

CNG Cars: सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' कार आहेत बेस्ट ऑप्शन

CNG Cars: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे आणि यामुळेच कंपन्या सीएनजीसह त्यांचे लोकप्रिय मॉडेल लॉन्च करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 सप्टेंबर : सणासुदीच्या काळात कार खरेदीसाठी ग्राहकांची पसंती असते. यामुळे या काळात जवळपास सर्वच कंपन्या त्यांच्या कारवर भरघोस सूट देत आहेत. मात्र या सणासुदीनंतर अनेक कंपन्या त्यांचे नवीन सीएनजी मॉडेल बाजारात आणणार आहेत आणि या यादीत मारुती, टाटा, किया आणि ह्युंदाईच्या कारचा समावेश आहे.

Maruti Baleno CNG

मारुती लवकरच बलेनो हॅचबॅकची नवीन सीएनजी व्हर्जन लॉन्च करणार आहे. या कारला सीएनजीमध्ये 1.2 लीटर इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 77पीएस पॉवर आणि 98.5 न्यूटन टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. CNG Baleno 2022 मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह बाजारात लॉन्च केली जाईल.

ट्रेन वेळापत्रकानुसार उशीरा असल्यास IRCTCकडून 'या' सेवा फ्री मिळतात; चेक करा तुमचे अधिकार

Maruti Brezza CNG

कंपनीने नुकतीच नवीन Brezza लाँच केली असून या कारमध्ये न्यू जनरेशन के-सीरिज 1.5- ड्युअल जेट डब्ल्यूटी इंजिन दिले आहे. हे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते आणि इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कंपनी लवकरच आपला CNG अवतार बाजारात आणणार आहे.

Kia Carens CNG

Kia Carense सध्या देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या MUV पैकी एक आहे. अशा परिस्थितीत, Kia India MUV ची विक्री वाढवण्यासाठी फॅक्टरी फिटेड CNG सह कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याचे CNG प्रकार 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येऊ शकते.

पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची आता गरज नाही; 'या' योजनांमध्ये करा घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक

सीएनजी कार

Hyundai Alcazar CNG, Tata Altroz ​​CNG, Tata Punch CNG, Tata Nexon CNG या कार देखील ग्राहकांसाठी नवीन पर्याय असू शकतात. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सीएनजी कारची मागणी सातत्याने वाढत आहे आणि यामुळेच कंपन्या सीएनजीसह त्यांचे लोकप्रिय मॉडेल लॉन्च करत आहेत. त्यामुळे या कॅटगरतील स्पर्धा खूप वाढली आहे.

First published:

Tags: Auto expo, Car