Gold Price Today: आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, 2600 रुपयांनी घसरले चांदीचे दर

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold, Silver Prices) चढउतार सुरू आहे. अशावेळी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold, Silver Prices) चढउतार सुरू आहे. अशावेळी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 18 जून: सोन्याचांदीची खरेदी करण्यासाठी (Gold-Silver Price) सध्या योग्य संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात (Gold, Silver Prices) चढउतार सुरू आहे.   अशावेळी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.  शुक्रवारी गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,410 रुपयांवरून कमी होत 47,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर चांदीचे दर 70,300 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 60 रुपये प्रति तोळाने कमी होत 48,350 रुपये झाला आहे. रेकॉर्ड स्तरावरुन 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं जर तुम्ही सोनेखरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे. कारण रेकॉर्ड हाय वरून सोन्याचे दर 9000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त होते. सोन्याचे लेटेस्ट दर (Gold Price Today, 18 June) गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये हे दर कमी होऊन 45,150 रुपये प्रति तोळा झाले आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर  47,350 रुपये तर कोलकातामध्ये दर 47,180 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-2 रुपयांचं हे नाणं बनवेल लखपती! वाचा कशी करता येईल 5 लाख रुपयांची कमाई चांदीचे लेटेस्ट दर (Silver Price Today, 18 June) आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते शुक्रवारी चांदीच दर 2600 रुपयांनी कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 1 किलो चांदीचे दर 67,700 रुपये आहेत. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे 67,700, 67,700 आणि 74,400 रुपये आहेत. हे वाचा-या योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा सविस्तर कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: