मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गलेलठं पगाराची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, बिझनेस, नवउद्योजकांसाठी शेअर केल्या खास टिप्स

गलेलठं पगाराची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, बिझनेस, नवउद्योजकांसाठी शेअर केल्या खास टिप्स

गोल्डमन सॅक्समध्ये (Goldman Sachs) इन्व्हेस्टमेंट बँकर (investment banker) म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर बजार्क मिक्केलसेन (Bjarke Mikkelsen) विचारात पडला

गोल्डमन सॅक्समध्ये (Goldman Sachs) इन्व्हेस्टमेंट बँकर (investment banker) म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर बजार्क मिक्केलसेन (Bjarke Mikkelsen) विचारात पडला

गोल्डमन सॅक्समध्ये (Goldman Sachs) इन्व्हेस्टमेंट बँकर (investment banker) म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर बजार्क मिक्केलसेन (Bjarke Mikkelsen) विचारात पडला

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : गोल्डमन सॅक्समध्ये (Goldman Sachs) इन्व्हेस्टमेंट बँकर (investment banker) म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर बजार्क मिक्केलसेन (Bjarke Mikkelsen) विचारात पडला. "माझं आयुष्य खूप आरामदायी होतं, पण माझ्या आयुष्यात काही उद्देश असल्यासारखं मला वाटत नव्हतं, “बँकिंगमध्ये, तुम्ही नेहमीच अॅडव्हायजर असता.

मला बिझनेस करायचा आहे, मला टेकमध्ये काहीतरी करायचंय हे मला माहीत होतं. पण त्यातल्यात्यात मला ऑपरेशनल अॅस्पेक्ट्स असलेलं काहीतरी करायचं होतं," असं बजार्क CNBC मेक इटशी बोलताना म्हणाला. याच आकांक्षा बाळगत हा 34 वर्षीय तरुण थेट पाकिस्तानात पोहोचला आणि तिथे त्याने 'दराझ' (Daraz) नावाची ई-कॉमर्स मार्केटप्लेस सुरू केली. सीएनबीसी डॉट कॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

“अ‍ॅमेझॉन आणि अलिबाबापासून प्रेरणा घेऊन काहीतरी तयार करण्याची कल्पना नेहमीच होती. यामध्ये ई-कॉमर्स मार्केटप्लेस, लॉजिस्टिक्स आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे तीन महत्त्वाचे घटक होते. ई-कॉमर्सबद्दल मला सर्वांत जास्त आवडत असलेली एक गोष्ट म्हणजे ते सर्वांसाठी सारखं आहे," असं दराझचा फाउंडर आणि सीईओ बजार्क मिक्केलसेन म्हणतो.

2018 मध्ये बिझनेस सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी अलिबाबाने दक्षिण आशियामध्ये चिनी ई-कॉमर्स कंपन्यांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दराझला विकत घेतलं. Daraz आता पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि म्यानमारमध्ये कार्यरत असून, 40 मिलियन ग्राहकांना सेवा देत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

“तुम्ही पुरुष किंवा स्त्री असाल किंवा तुम्ही मोठ्या शहरात किंवा ग्रामीण भागात राहता याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाला बिझनेस सुरू करण्यासाठी विक्रेता म्हणून आणि ग्राहक म्हणून समान संधी आहे,” असं मिक्केलसेन म्हणतो. दक्षिण आशियामध्ये सर्वांनाच ऑफलाइन रिटेल इन्स्फ्रास्ट्रक्चरचा सारखा अॅक्सेस नाही, त्यामुळे इक्वलायझिंग हा फॅक्टर माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला आणि मी यातच काम करायचं ठरवलं, असं त्याने सांगितलं.

या मिक्केलसेनने आपला स्टार्टअप दक्षिण आशियातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लेयरपैकी एक कसा बनवला? याबद्दल काही टिप्स त्याने CNBC मेक इटसह शेअर केल्या आहेत.

1. योग्य ठिकाणी मेहनत करा.

मिक्केलसेनने 2015 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग सोडली, तेव्हा टेक स्टार्टअप्सची खूप क्रेझ होती. त्यामुळे काही करायचं ठरवलं की फंडिंग मिळणं खूप सोपं होतं. पण तरीही संधींचं मूल्यांकन करणं आणि संभाव्य ग्राहक शोधण्यात योग्य परिश्रम करणं महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितलं.

"मी बाजारपेठेचा अभ्यास करण्यात आणि पोटेन्शिअल कुठं आहे हे समजून घेण्यात बराच वेळ घालवला. त्यानंतर मी दक्षिण आशियाकडे पाहण्यास सुरुवात केली आणि मला समजलं, की तो जगाचा एक मोठा भाग आहे पण तिथे ई-कॉमर्स नव्हतं. अर्धा अब्ज लोकसंख्या असलेला हा भाग दुर्लक्षित असल्याचं मला लक्षात आलं," असं तो म्हणाला. त्यानंतर मिक्केलसेनने पाकिस्तान गाठलं तिथे तो तीन वर्षं राहिला आणि दुर्गम भागात प्रवास करून तिथल्या लोकांच्या गरजा आणि संस्कृती समजून घेतली. आपण व्हॅल्यू अॅड केल्याशिवाय नफा मिळवून देणारा बिझनेस उभा करू शकत नाही, असं तो सांगतो.

2. 100% देणं

तुम्हाला तुमचा बिझनेस 90% वरून 100% पर्यंत नेता आला पाहिजे, कारण खरी जादू तिथेच असते. "एखादं उत्तम उत्पादन लाँच करण्यासाठी आणि उत्तम सेवा तयार करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, याची तुम्हाला जाणीव असायला हवी. कारण 90% म्हणजे प्रत्यक्षात काहीच नाही, त्यामुळे तुम्हाला बिझनेस 100% पर्यंत पोहोचवावा लागेल. मला माहीत नाही मी काय करत होतो, पण काही गोष्टी आव्हानात्मक होत्या व त्या 100 टक्के बरोबर करत होतो. ई-कॉमर्स खूप वेगवान आहे, त्यामुळे लोकांवर नेहमीच पुढील प्रोजेक्ट किंवा टार्गेटवर जाण्याचा दबाव असतो. पण मी खरोखरच गोष्टी कमी करण्याचा, थांबवण्याचा आणि त्याबद्दल सर्व जाणून घेऊन नंतर वेगाने करण्याची प्रॅक्टिस करतो," असं तो म्हणाला.

3. काम कधीच संपत नाही

"Daraz चांगल्या मार्जिनने नफा मिळवण्याच्या मार्गावर असलं तरी काम पूर्ण झालं नाहीये. मला असं वाटायचं की कधीतरी, एकदा आपण बिलियन डॉलर्सच्या बिझनेसमध्ये पोहोचलो की स्टेबल प्रोसेस होईल. पण मला आता जाणवतंय की अलिबाबासाठीही ही एक यंत्रणा आहे, जी नेहमीच विकसित होत राहील. आमचं बिझनेस मॉडेल कधीही पूर्ण होणार नाही. आम्हाला मार्केटमधील आव्हानांसाठी आणि नवीन ट्रेंडसाठी ऑप्टिमाइझ करणं आणि बदलत राहणं आवश्यक आहे,” असं मिक्केलसेन म्हणाला.

Daraz चांगलं स्केल करत आहे की नाही याची खात्री करणे, हे मिक्केलसेनचे पुढील लक्ष्य आहे. "आमच्याकडे अॅपवर दर महिन्याला 40 मिलियनहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर 100,000 पेक्षा जास्त विक्रेते आहेत, जिथे आम्ही खरोखर संधी निर्माण करत आहोत आणि लोकांचं जीवन अधिक सुसह्य करत आहोत," असंही त्याने सांगितलं.

4. बुडणं किंवा पोहणं दोनच पर्याय

तुम्ही बुडाल किंवा पोहाल, या मानसिकतेनेच बिझनेस करा, असा सल्ला तो नवउद्योजकांना देतो. “मी लोकांना फक्त प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करेन. कोणीही अपयशाला घाबरू नका कारण अपयश नॉर्मल आहे. अनेकदा तुम्ही काम करताकरता शिकता आणि त्यामुळे डेव्हलपमेंट प्रोसेस खूप लवकर होते. बँकिंगमधून टेक उद्योजक बनणं खूप कठीण आणि भितीदायक होतं पण मिक्केलसेनला त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. 'मी माझ्यासाठी केलेली ती सर्वात बेस्ट गोष्ट होती', असं मिक्केलसेन म्हणतो.

First published: