मुंबई : पावसामुळे आधीच भाजीपाला महाग झाला आहे. त्यामध्ये गॅस महागला महागाईच्या झळा तीव्र बसत असताना आता त्यात भर कांद्याची पडणार आहे. कांदा गृहिणींचं बजेट कोडमडणार एवढं नाही तर भाजीची चव आणि तांबड्या-पांढऱ्या रश्शासोबत कच्चा खाण्याची मजाही महाग होणार आहे. कांदा पुन्हा एकदा रडवणार तर शेतकऱ्यांना अच्छे दिन आणणार असं दिसतं आहे. सध्या बाजारात कांदा २५ ते ३० रुपये किलो मिळत आहे. अगदीच मोठा आणि चांगला ए वन कांदा घेतला तर जवळपास ३५ रुपयांकडे जातो. सततच्या मुसळधार पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहे. जुना कांदा भिजल्याने खराब होत आहे. कांद्याचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थित आहेत. आता ते वाढू शकतात. कारण साठवलेला कांदा पावसामुळे खराब होऊ लागला आहे. हे वाचा-Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम श्रावणानंतर कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दसरा दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास १० ते १५ रुपयांनी कांद्याचे दर वाढू शकतात. घाऊक बाजारात सध्या कांद्याचे दर १० ते १४ रुपये आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर २० ते ३० रुपये आहेत. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसानं काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान झालं. तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवीन कांद्याची काढणी नोव्हेंबरला होईल. त्यामुळे एक ते दीड महिना नागरिकांच्या खिशाला जास्त कात्री लागू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.