Home /News /money /

Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर तपासा मुंबईतील आजचा भाव

Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी झाल्यानंतर तपासा मुंबईतील आजचा भाव

केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे.

    नवी दिल्ली, 22 मे : तेल कंपन्यांनी रविवारी 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल दर 96.72 रुपये प्रति लीटर (Petrol Diesel Prices Today) झाला आहे. तर डिझेल 89.62 रुपये इतकं आहे. उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोल 8.69 रुपये आणि डिझेल 7.5 रुपये स्वस्त झालं आहे. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलची किंमत 113.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये इतकं आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे. 46 दिवसांनंतर किमतीत बदल - 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल-डिझेल दरात सतत वाढ होत होती. या दिवसांत तब्बल 15 वेळा दरवाढ झाली. पेट्रोल-डिझेल दरात जवळपास 10 रुपयांची वाढ करण्यात आली होती. परंतु 6 एप्रिलपासून दर स्थिर होते. त्यानंतर आता 46 दिवसांनंतर सरकारने पेट्रोल-डिझेल दरात बदल केले आहेत. दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - BREAKING | महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात

    SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या