मराठी बातम्या /बातम्या /मनी /सामान्यांना मोठा दिलासा! पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत, केंद्राने उचललं महत्त्वाचं पाऊल

सामान्यांना मोठा दिलासा! पुढील वर्षापर्यंत नाही वाढणार कांद्याची किंमत, केंद्राने उचललं महत्त्वाचं पाऊल

केंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) पुढील दीड महिन्यांसाठी शिथिलता आणली आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) पुढील दीड महिन्यांसाठी शिथिलता आणली आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) पुढील दीड महिन्यांसाठी शिथिलता आणली आहे.

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: कोरोना संकटाच्या काळात रोजगार आणि आर्थिक समस्यांना तोंड देणाऱ्या सामान्य  जनतेचं बजेट काही दिवसांपासून कांदा देखील रडवत आहे. मात्र या सामान्य जनतेला आता सरकारने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या किरकोळ किंमती (Onion Retail Prices) नियंत्रणात आणण्यासाठी आयातीच्या नियमांमध्ये (Import Norms) आणलेली शिथिलता 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किरकोळ किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 31 ऑक्टोबर 2020 रोजी कांद्याच्या आयातीसाठी सरकारने 15 डिसेंबर 2020 पर्यंत उदारमतवादी व्यवस्थेनुसार आयातीला मंजुरी दिली होती आणि Plant Quarantine Order (पीक्यूओ) 2003 अंतर्गत फायटोसॅनेटरी सर्टिफिकेटवरील अतिरिक्त घोषणेस सूट दिली होती. आता ही शिथिलता वाढवल्यामुळे पुढील वर्षी 31 जानेवारीपर्यंत कांद्याचे दर वाढणार नाहीत.

कृषी मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की कोरोना संकटाच्या आधीपासूनच बाजारात कांद्याच्या किरकोळ किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील दीड महिन्यासाठी कांदा आयात नियमात सवलत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने काही अटींसह ही सूट दिली आहे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात ध्रुवीकरणाशिवाय आयातित कांद्याचे फ्यूमिगेशन आयात मान्यताप्राप्त प्रदात्याकडून करावी लागेल.

(हे वाचा-नोकरी गेली तरीही EMI चं नो टेन्शन! आर्थिक सुरक्षा देणारी 'जॉब लॉस पॉलिसी')

क्वारंटाईन अधिकारी आयात केलेल्या कांद्याची तपासणी करेल आणि कीटकनाशकमुक्त असल्याची समाधानी झाल्यावरच ती पुढे पाठवली जाईल. कृषी मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 'या अटीनुसार आयात केलेल्या कांदा केवळ वापरासाठी आहे, तो साठवला जाणार नाही असे प्रतिज्ञापत्रही आयात व्यापाऱ्यांकडून घेतले जाईल.'

First published:

Tags: Onion, Priceonion