मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केंद्र सरकारची नवी Scheme; थेट सुरु करू शकता पोस्ट ऑफिस, जाणून घ्या प्रक्रिया

केंद्र सरकारची नवी Scheme; थेट सुरु करू शकता पोस्ट ऑफिस, जाणून घ्या प्रक्रिया

India Post Office Franchise: पोस्ट ऑफिससोबत काम करण्याची एक उत्तम संधी भारतीय पोस्टाने (India Post) तुमच्यासाठी खुली केली आहे. त्यामुळे तुम्हाला थेट पोस्ट ऑफिस सुरू करण्याची परवानगी सरकारकडून मिळणार आहे.

India Post Office Franchise: पोस्ट ऑफिससोबत काम करण्याची एक उत्तम संधी भारतीय पोस्टाने (India Post) तुमच्यासाठी खुली केली आहे. त्यामुळे तुम्हाला थेट पोस्ट ऑफिस सुरू करण्याची परवानगी सरकारकडून मिळणार आहे.

India Post Office Franchise: पोस्ट ऑफिससोबत काम करण्याची एक उत्तम संधी भारतीय पोस्टाने (India Post) तुमच्यासाठी खुली केली आहे. त्यामुळे तुम्हाला थेट पोस्ट ऑफिस सुरू करण्याची परवानगी सरकारकडून मिळणार आहे.

नवी दिल्ली, 12 जुलै: पोस्ट हे केंद्र सरकारअंतर्गत येणारं डिपार्टमेंट आहे. काही जणांची त्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची इच्छा असते. पण काही कारणास्तव त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. पण पोस्ट ऑफिससोबत काम करण्याची एक उत्तम संधी भारतीय पोस्टाने (India Post) तुमच्यासाठी खुली केली आहे. त्यामुळे तुम्हाला थेट पोस्ट ऑफिस सुरू करण्याची परवानगी सरकारकडून मिळणार आहे. टीव्ही9 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. जर तुम्हाला काही बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रॅँचायझी (Franchise) घेऊ शकता आणि मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकता. पोस्ट खातं देशभर पसरलं आहे. त्यामुळे या व्यवसायाला चांगला वाव आहे. तुम्ही याबद्दल अधिक जाणून घ्या म्हणजे तुम्हाला निर्णय घेता येईल. पोस्ट ऑफिस फ्रँचायझी म्हणजे काय? सर्वप्रथम फ्रँचायझी या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. फ्रँचायझी (Post Franchise) म्हणजे एखाद्या सरकारी किंवा खाजगी कंपनीचा माल किंवा सेवा विशिष्ट प्रदेशात, क्षेत्रात विकण्याची अधिकृत परवानगी असणे. म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या वतीने तुम्हाला त्यांच्या सेवा एका विशिष्ट गावात पुरवाव्या लागतील. भारतात एकूण 1 लाख 55 हजार पोस्ट ऑफिस (Post Offices) आहेत. ही पोस्ट खात्याच्या वतीने चालवली जातात. तरीही काही भागात पोस्टाची सेवा पोहचू शकत नाही, तिथे सेवा पुरवणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी पात्र व्यक्तींना पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी सुरू करण्याची संधी भारतीय पोस्ट उपलब्ध करून देत आहे. म्हणजे जिथे सध्या पोस्टाची सेवा उपलब्ध आहे तो भाग वगळता ज्या भागात ही सेवा पोहोचत नाही. अशा भागात जर तुम्ही सेवा देऊ शकत असाल तर तुम्ही या योजनेसाठी सुयोग्य उमेदवार आहात.

Good News! मोदी सरकारकडून आजपासून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत

कोण घेऊ शकते फ्रँचायझी? पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही किमान आठवी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचे वय 18 च्या पुढे असायला हवं. तसंच घरातील कोणीही व्यक्ती भारतीय पोस्टात नोकरीला असता कामा नये. आपल्याकडे किमान 200 स्क्वेअर फुटांची जागा असावी जिथे तुम्ही हे पोस्ट ऑफिस चालू करू शकाल. या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या फँचायझीसाठी अर्ज करू शकता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जरी फ्रँचायझी मिळाली तरीही तुम्हाला पत्रं पोचवण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. ते काम पोस्ट खातंच करणार आहे. पोस्टाच्या ऑफिसमध्ये ज्या सेवा दिल्या जातात त्याच तुम्हाला फ्रँचायझीच्या मार्फत देता येतील. पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत. एक फ्रँचायझी आउटलेट आणि दुसरा प्रकार म्हणजे पोस्टल एजंट (Postal Agent). फ्रँचायजी आउटलेटच्या माध्यमातून तुम्ही पोस्टाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्टॅँप विक्री, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर बुक करणं यासारख्या अनेक सेवा प्रदान करू शकता. फ्रँचायझी घ्यायला पोस्टल एजंटपेक्षा कमी प्रमाणात सिक्युरिटी अमाउंटची (Security Amount) आवश्यकता असते.

Banking Fraud Alert! कोणत्याही Untrusted Sources वरुन डाउनलोड करू नका App, अन्यथा बसेल फटका

काय आहे प्रक्रिया? पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला http://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि तो फॉर्म भरून जवळील पोस्टात सबमिट करू शकता. यासोबत तुम्हाला 5000 रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटही भरावं लागेल. त्यानंतर आपली पात्रता पाहून पोस्ट खातं आपल्याशी संपर्क साधेल. पोस्टाने तुमची निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकृत क्षेत्रात स्टॅँप, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर बुक करणं यासारख्या सेवा जनतेला पुरवाव्या लागतील. तुम्ही देणाऱ्या सेवांवर पोस्ट आणि तुमच्यात ठरलेल्या दरानुसार तुम्हाला कमिशन प्राप्त होईल. स्पीड पोस्टासाठी 5 रुपये, मनी ऑर्डरसाठी 3 ते 5 रुपये आणि घरपोच पुरवलेल्या पोस्टल स्टँप आणि स्टेशनरीवर 5% कमिशन मिळू शकते.
First published:

Tags: Post office, Post office money, Post office saving

पुढील बातम्या