मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI नं लाँच केलं अनोखं क्रेडिट कार्ड, खरेदीवर मिळेल मोठा कॅशबॅक

SBI नं लाँच केलं अनोखं क्रेडिट कार्ड, खरेदीवर मिळेल मोठा कॅशबॅक

Cashback Credit Card: क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. SBI कार्ड्सने 'कॅशबॅक क्रेडिट कार्ड' लाँच केले आहे.

Cashback Credit Card: क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. SBI कार्ड्सने 'कॅशबॅक क्रेडिट कार्ड' लाँच केले आहे.

Cashback Credit Card: क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. SBI कार्ड्सने 'कॅशबॅक क्रेडिट कार्ड' लाँच केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 सप्टेंबरअलीकडच्या काळात क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक लोक विविध बँकांच्या क्रेडिट कार्डवरती मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. बँकाही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची क्रेडिट कार्ड ऑफर करत असतात. क्रेडिट कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विविध ऑफर्सचाही फायदा घेता येतो.  स्मार्टफोन, कपडे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अशा एक ना दोन अनेक गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येतात.  आता क्रेडिट कार्ड  वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. SBI कार्ड्सनं ग्राहकांसाठी एक खास क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे.  हे एक 'कॅशबॅक क्रेडिट कार्ड' (Cashback Credit Card) आहे. याचा कार्डधारकांना खूप फायदा होईल, कारण यामुळं कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय सर्व ऑनलाइन व्यवहारांवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. हा कॅशबॅक प्रति महिना 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित असेल.

अर्ज कसा करायचा?

या संदर्भात, SBI कार्ड्सनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, Tier-II आणि Tier-III शहरांसह संपूर्ण भारतातील ग्राहक 'SBI कार्ड स्प्रिंट'  (SBI Card Sprint) या डिजिटल अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही घरबसल्या 'कॅश बॅक क्रेडिट' कार्डसाठी अर्ज करू शकता.

कॅशबॅक कार्ड मार्च 2023 पर्यंत मोफत-

SBI कार्डच्या प्रेस रिलीझनुसार, 'कॅशबॅक SBI कार्ड ग्राहकांना अमर्यादित 1 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. दरमहा ऑनलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतचा असेल. त्यामुळं ग्राहकांना फायदे मिळवण्यासाठी फक्त काही व्यापाऱ्यांसोबत खरेदी करण्यापुरतं मर्यादित राहावं लागणार नाही. कॅशबॅक एसबीआय कार्ड कॅशबॅक सुविधेच्या ऑटो-क्रेडिटसह येते. ज्यामुळं स्टेटमेंट जनरेशनच्या दोन दिवसांच्या आत एसबीआय कार्ड खात्यात कॅशबॅक जमा होतो.

हेही वाचा- Income Tax: कर भरल्यानंतरही आलीये आयकर विभागाची नोटीस? त्वरित करा ही प्रोसेस

इतकी आहे नुतनीकरण फी-

कॅशबॅक कार्डचे वार्षिक नूतनीकरण शुल्क 999 रुपये आहे. एका वर्षात किमान 2 लाख रुपयांपर्यंतच्या खरेदीवर कार्डधारकांना 999 रुपये वार्षिक शुल्क परत केले जाईल. कॅशबॅक SBI कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

First published:

Tags: Credit card, SBI