Home /News /money /

आता कार्ड जवळ नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे; पाहा काय आहे RBI ची योजना

आता कार्ड जवळ नसतानाही ATM मधून काढता येणार पैसे; पाहा काय आहे RBI ची योजना

आरबीआयने म्हटले आहे की, सर्व बँका, एटीएम नेटवर्क आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर त्यांच्या एटीएममध्ये इंटरऑपरेबल कार्ड-लेस कॅश काढण्याचा पर्याय देऊ शकतात. ते कसे कार्य करते ते जाणून घ्या

    नवी दिल्ली, 21 मे : रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातल्या सर्व बँकांना आणि एटीएम सेवा केंद्रांना कार्डलेस कॅश सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 19 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका सर्क्युलरमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये “सर्व बँका, एटीएम आणि व्हाइट लेबल एटीएम केंद्रांनी ग्राहकांना ‘इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल’ (Interoperable cardless cash withdrawal) सुविधा पुरवावी” असं सांगण्यात आलं आहे. कार्डलेस पद्धतीने पैसे काढण्यासाठी चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या कार्डलेस कॅश विड्रॉवल (Cardless Cash withdrawal) सुविधा अगदी मोजक्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. तसंच, केवळ त्याच बँकांच्या ग्राहकांना त्या एटीएममधून कार्डलेस पद्धतीने पैसे काढता येऊ शकतात; मात्र आता यूपीआयच्या (UPI) मदतीने सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कमध्ये (ATM Networks) ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देण्यात आले असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी स्पष्ट केलं. एप्रिलमध्ये मॉनेटरी पॉलिसी कमिटीने (MPC) घेतलेले निर्णय जाहीर करताना त्यांनी याबाबत माहिती दिली होती. कार्डलेस कॅश विड्रॉवल म्हणजे काय? नावात म्हटल्याप्रमाणेच, या पद्धतीने एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड (Cash withdrawal without Card) सोबत बाळगण्याची गरज नसेल. एटीएम मशीनमध्ये यूपीआय डीटेल्स टाकून तुम्ही पैसे काढू शकाल. यासाठी तुमच्याकडे यूपीआय आयडी आणि तुमच्या मोबाइलमध्ये बँकेचं किंवा यूपीआय अ‍ॅप असायला हवं. हे 11 स्टॉक्स सध्या आहेत Top वर, 3-4 आठवड्यात मिळू शकतो जबरदस्त परतावा! हे कसं काम करतं? ही सुविधा सर्वत्र उपलब्ध करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (NPCI) सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कमध्ये यूपीआय सुविधा (UPI in ATM) सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच त्यातले व्यवहार नॅशनल फायनान्शिअल स्विच (NFC) किंवा एटीएम नेटवर्कच्या मार्फत पार पडणार आहेत, असं आरबीआयने स्पष्ट केलं. अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत कार्डलेस कॅश विड्रॉवलसाठी (Cardless Cash withdrawal charges) ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस घेण्यात येणार नसल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं; मात्र या व्यवहारांना सर्क्युलरमध्ये शिफारस केल्याप्रमाणे इंटरचेंज फी आणि कस्टमर चार्जेस लागू राहतील. सध्या बँक ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएमवरून एका महिन्यात पाच वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करू शकतात. दुसऱ्या बँकेच्या एटीएमसाठी ही मर्यादा तीन ट्रान्झॅक्शन्स एवढी आहे. यानंतरच्या ट्रान्झॅक्शनसाठी (ATM Transaction charges) बँक प्रत्येकी 21 रुपये आकारते. कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनसाठीदेखील अशाच प्रकारचे दर लागू राहणार आहेत. तसंच एका वेळी किती पैसे काढता यावेत याचं लिमिटदेखील तुमच्या बँकेच्या नियमांप्रमाणे असेल. HDFC बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! बॅंकेकडून FD व्याजदरांत वाढ क्रेडिट-डेबिट कार्ड स्कॅम टाळण्यासाठी फायदा डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे लुटण्याचे प्रकार आपण राजरोसपणे पाहतो. एटीएम मशीनमध्ये कॅमेरा लावून कार्डची माहिती चोरणं, कार्डचं क्लोनिंग करणे अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक झाल्याचं आपण ऐकून आहोत. आरबीआयच्या या निर्णयामुळे अशा प्रकारच्या फसवणुकींना आळा बसेल, असं पायोनीअर लीगलचे पार्टनर मयंक मेहता म्हणाले. “कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करण्याचे प्रमाणही वाढलं आहे. कार्डलेस कॅश विड्रॉवलच्या या सुविधेमुळे ग्राहकांना आपल्या सोयीनुसार केव्हाही पैसे काढता येतील. तसंच, यामुळे यूपीआय व्यवहारांनाही चालना मिळणार आहे,” असं मत युरोनेट वर्ल्डवाइडच्या इंडिया अँड साउथ एशिया डिव्हिजनचे एमडी प्रणय झवेरी यांनी व्यक्त केलं.
    First published:

    Tags: ATM, Rbi

    पुढील बातम्या