जाहिरात
मराठी बातम्या / मनी / EMI न भरल्याने रिकव्हरी एजेंटने कार उचलून नेली तर काय? जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार

EMI न भरल्याने रिकव्हरी एजेंटने कार उचलून नेली तर काय? जाणून घ्या ग्राहकांचे अधिकार

कार लोन

कार लोन

EMI: तुम्ही कोणत्याही फायनेंशियल प्रॉब्लममुळे आपल्या कार लोनचा EMI भरु शकत नसाल तर तुमच्या बँकेविरोधात कटोर पाऊलं उचलली जाऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये गाडी रिकव्हरही केली जाऊ शकते. पण अशा वेळी ग्राहकांकडेही काही अधिकार असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जुलै : सध्याच्या काळात सामान्य मानसांसाठी कार खरेदी करणं खूप सोपं झालंय. बँक तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि इन्कमच्या आधारावर 80 टक्के अमाउंटपर्यंत फायनेंस करतात. या सुविधेमुळे कार लोन घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पात्र अनेकदा वित्तीय अस्थिरतेमुळे वेळेवर ईएमआय भरता येत नाही. अशा वेळी फायनेंस कंपनीकडून रिकव्हरीची कारवाई केली जाते. तुम्ही कार लोन EMI न भरल्यास, रिकव्हरी एजंट तुमचे वाहन उचलू शकतो. आज आपण जाणून घेऊया की, कोणत्या परिस्थितीत रिकव्हरी एजंट तुमचे वाहन घेऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणते अधिकार आहेत आणि तुम्ही अशा परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकता.

News18लोकमत
News18लोकमत

ईएमआय भरला नाही तर बँक काय करते तुम्ही कार लोनचा ईएमआय भरला नाही, तर अशा परिस्थितीत बँक पैसे वसूल करण्यासाठी सर्व मार्ग अवलंबते आणि अनेक प्रकरणांमध्ये तुमचे वाहनही ताब्यात घेते. तुमचा EMI एकदा बाउन्स झाल्यास, बँक तुम्हाला रिमाइंडर कॉल पाठवते आणि तुम्हाला दंडासह पैसे भरण्याचा ऑप्शन देते. तुम्ही सलग दुसऱ्यांदा EMI भरला नाही, तर तुम्हाला EMI भरण्यासाठी बँकेकडून एक पत्र येते आणि बँकेचे प्रतिनिधी देखील तुमच्या घरी येऊन तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तसेच, तुम्ही कर्जाच्या डॉक्यूमेंटमध्ये नमूद केलेल्या गँरेटरांसोबतही संपर्क साधला जाऊ शकतो. IRCTC च्या साइटवर बुक होत नाहीतेय तिकीटं! रेल्वेने सांगितली सोपी ट्रिक असं केल्याने बँक ताब्यात घेईल तुमची गाडी तुम्ही सलग कार लोनचे तीन ईएमआय भरले नाही आणि बँकेला याची कारणं सांगितली नाही तर बँक तुमच्याविरोधात कठोर पाऊलं उचलते. अशा वेळी बँक तुमच्या केसला नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये काउंट करते. यासोबतच बँक कार रिकव्हरीची कारवाई सुरु करते. या दरम्यान बँक रिकव्हरी एजेंट्स तुमच्या घरी येतात आणि कागदोपत्री कारवाई केल्यानंतर गाडी रिकव्हर करुन आपल्या सोबत घेऊन जातात. गाडी रिकव्हरीनंतर बँक तुम्हाला आणखी एका महिन्याची वेळ देते. या वेळी दिलेल्या मुदतीत तुम्हाला चार महिन्यांचा ईएमआय, पॅनल्टी आणि गाडी जिथे पार्क केली आहे त्या वेयरहाउसचा पार्किंग चार्ज फेडावा लागतो. Credit Card चं बिल डोकेदुखी बनलंय? ट्राय करा या पद्धती, उतरेल कर्जाचं ओझं ग्राहकांचे अधिकार अवश्य घ्या जाणून कर्जाची परतफेड केली नसली तरीही कोणताही बँक रिकव्हरी एजंट तुमच्याकडून जबरदस्तीने वाहन घेऊ शकत नाही. या विरोधात तुम्ही पोलिस तक्रार दाखल करू शकता. रिकव्हरी एजंट तुमच्याशी वाईट वागू शकत नाही. यासोबतच, ज्या व्यक्तीच्या नावावर कार लोन घेतले आहे किंवा करारनाम्यात गॅरंटर आहे त्या व्यक्तीशिवाय बँक तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती इतर कोणालाही देऊ शकत नाही. तुम्ही ईएमआय भरण्यास असमर्थ असल्यास, तुम्ही बँकेशी संपर्क साधून त्यांना तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगू शकता. अशा प्रकारे, तुम्ही बँकेला ईएमआयची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागू शकता. मात्र, तुम्हाला वेळ द्यायचा की नाही हे बँकेच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर तुम्हाला अतिरिक्त वेळ मिळाला तर तुम्हाला यासाठी जास्त व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car , loan , Money18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात