मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पोपट झाला रे! बायकोला देणारे होता सरप्राईज गिफ्ट, हातावर टॅटू काढताना झाली फजिती

पोपट झाला रे! बायकोला देणारे होता सरप्राईज गिफ्ट, हातावर टॅटू काढताना झाली फजिती

त्याला वेगळाच टॅटू काढायला होता आणि हातावर उमटला वेगळाच. प्रश्न केवळ टॅटूचा नव्हता, तो होता आयुष्यातील एका मोठ्या तारखेचा.

त्याला वेगळाच टॅटू काढायला होता आणि हातावर उमटला वेगळाच. प्रश्न केवळ टॅटूचा नव्हता, तो होता आयुष्यातील एका मोठ्या तारखेचा.

त्याला वेगळाच टॅटू काढायला होता आणि हातावर उमटला वेगळाच. प्रश्न केवळ टॅटूचा नव्हता, तो होता आयुष्यातील एका मोठ्या तारखेचा.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 19 डिसेंबर: आपल्या लग्नाची तारीख (Wedding Date) हातावर गोंदवून (Tattoo) पत्नीला सरप्राईज (Surprise to wife) देण्याच्या बेतात असणाऱ्या पतीचा चांगलाच (Wrong tattoo) पोपट झाला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पती आणि पत्नी (Husband and wife) दोघांनीही एकमेकांना गिफ्ट (Gift) देण्याचा निर्णय घेतला होता. काहीतरी जगावेगळं करून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पती टॅटू काढायला गेल्यावर असं काही घडलं की ही चूक आता आय़ुष्यभर लक्षात राहणारी ठरली.

वाढदिवशी द्यायचं होतं सरप्राईज

Tiktok वरून एका तरुणानं स्वतःच्या फजितीची कहाणी शेअर केली आहे. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे एका वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि तो अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तरुणाच्या पत्नीनं तिच्या रिंग फिंगरवर तरुणाच्या नावाचं पहिलं अक्षर गोंदवलं आणि त्याला सरप्राईज दिलं. आता वेळ होती तरुणाची.

गोंदवली चुकीची तारीख

या तरुणाला लग्नाची तारीख गोंदवायची होती 1 जानेवारी 2019, म्हणजेच 1.01.19. ही तारीख त्यानं टॅटू आर्टिस्टला लिहून दिली. मात्र गडबडीत टॅटू आर्टिस्टनं ही तारीख चुकवली आणि त्याच्यावर लिहिलं गेलं 11.919. हातावर गोंदवलं जात असताना तरुणाचं त्याच्याकडं लक्षच नव्हतं. मात्र जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं, तेव्हा मात्र फारच उशीर झाला होता. आता ही तारीख जन्मभरासाठी त्याच्या हातावर कोरली गेली होती.

हे वाचा - Tiger Woods पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी Gold Player, लूक पाहून भडकतात लोक

नागरिकांच्या मजेशीर कमेंट्स

आपली फजिती शेअर करणाऱ्या या तरुणाच्या अनुभवानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मी माझ्या मोठ्या मुलीच्या जन्माची तारीख गोंदवणार होतो, मात्र हा प्रकार पाहिल्यावर आता हा निर्णय आपण रद्द केल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे, तर रोमन आकड्यांचे टॅटू काढताना अनेकदा हा घोळ होतो, त्यामुळे आकडे असणारे टॅटू काढूच नका, असा सल्लाही दुसऱ्या एका युजरने दिला आहे.

First published:

Tags: Tattoo, Wedding anniversary, Wife and husband