Home /News /money /

नवीन वर्षात खरेदी करा स्वत:चं आणि स्वस्त घर! ही बँक देते आहे संधी

नवीन वर्षात खरेदी करा स्वत:चं आणि स्वस्त घर! ही बँक देते आहे संधी

स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न अनेकजण उराशी बाळगून आहेत, मात्र घराच्या किंमती बजेटबाहेरच्या असल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. दरम्यान पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank ) स्वस्तात घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची एक चांगली संधी देत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 05 जानेवारी: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न अनेकजण उराशी बाळगून आहेत, मात्र घराच्या किंमती बजेटबाहेरच्या असल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. दरम्यान पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank ) स्वस्तात घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची एक चांगली संधी देत आहे. पंजाब नॅशनल बँक 8 जानेवारी 2021 रोजी काही मालमत्तांचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक (Residential and Commercial) दोन्ही प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. अशावेळी तुम्ही देखील घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. डिफॉल्टमध्ये आलेल्या विविध मालमत्तांचा लिलाव बँकांकडून करण्यात येतो, त्याप्रकारच्या या मालमत्ता आहेत. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) ने याबाबत माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून करण्यात येणाऱ्या ई-लिलावात एकूण 3080 निवासी मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याने अनेकांसाठी ही चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. (हे वाचा-बापरे! गुटखा बनवणाऱ्याने थकवला तब्बल 831 कोटींचा GST, अधिकारीही हैराण) पंजाब नॅशनल बँकेने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'गुंतवणूक करण्यासाठी मालमत्ता शोधत आहात? 8 जानेवारी 2021 रोजी पीएनबीने आयोजित केलेल्या ई-लिलावामध्ये परवडणाऱ्या दरात निवासी आणि व्यावसायिक प्रॉपर्टी मिळवा.' डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. पंजाब नॅशनल बँक देखील अशा प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते. किती आहे प्रॉपर्टी? यामध्ये 3080 निवासी प्रॉपर्टी आहे. याशिवाय 873 व्यावसायिक, 465 इंडस्ट्रियल तर 11 कृषी संबंधित प्रॉपर्टींचा समावेश आहे. या सर्व मालमत्तांचा लिलाव बँकेकडून करण्यात येणार आहे. (हे वाचा-2 भागांमध्ये असणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 29 जानेवारीपासून होणार सुरुवात) अधिक माहितीकरता तुम्ही https://ibapi.in/ या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकता. बँक मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड झाल्यानंतर स्थान आणि किती जागा आहे अशी माहिती असणारी सार्वजनिक नोटीस जारी करते. जर ई-लिलावच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर बँकेमध्ये जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या