मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात दिलासा, 6 महिन्यात दोन वेळा वाढला पगार

या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात दिलासा, 6 महिन्यात दोन वेळा वाढला पगार

आयटी कंपन्यांना देखील कोरोनाचा (IT Companies during Corona Period) मोठा फटका बसला आहे. मात्र त्यातून उभारी घेत अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 मे: कोरोनाचं संकट (Coronavirus Pandemic) अनेकांसाठी बिकट परिस्थिती घेऊन येणारं ठरलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकजण अद्यापही घरूनच काम करत (Work From Home) आहेत. आयटी कंपन्यांना देखील कोरोनाचा (IT Companies during Corona Period) मोठा फटका बसला आहे. मात्र त्यातून उभारी घेत अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील मोठ्या आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी त्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देऊ केली आहे. यामध्ये इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

काय होत आहे कर्मचाऱ्यांचा फायदा

अधिकतर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगारवाढ देत आहेत. तर काही प्रमोशन देखील देत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटकाळात अनेक कंपन्यांनी पगारवाढ आणि प्रमोशन रोखले होते, मीडिया अहवाानुसार मात्र यावेळी थोडा नफा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि प्रमोशन देखील केले जात आहे.

हे वाचा-Gold Price: सोन्याच्या किंमतीत घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने सहा महिन्यांच्या आतमध्ये दोन वेळा इनक्रिमेंट केले आहे. टीसीएस देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. ही पगारवाढ एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे.

इन्फोसिस हे देखील आयटी क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. इन्फोसिसने देखील कंपेनसेशन रिव्ह्यू सायकल सुरू केलं आहे. या अंतर्गत जानेवारी महिन्यात इनक्रिमेंट देखील देण्यात आलं आहे. याशिवाय परफॉर्मन्स वर आधारित रिव्ह्यू करून कंपनी जुलैमध्ये पुन्हा पगारवाढ देण्याची शक्यता आहे

हे वाचा-आताच करा चांदीमध्ये गुंतवणूक, सोन्यापेक्षा मिळेल अधिक फायदा; वाचा कसा होईल नफा

टेक महिंद्राने देखील अलीकडेच पगारवाढ केली आहे. ही पगारवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या इनक्रिमेंट संदर्भात कर्मचाऱ्यांना पत्र देखील पाठवले जात आहे. शिवाय चांगला परफॉर्मन्स असणाऱ्यांना अतिरिक्त बोनस देखील दिला जात आहे.

First published:

Tags: Employment, Money, TCS chairman