मराठी बातम्या /बातम्या /मनी /तनिष्कपासून कल्याण ज्वेलर्सचे ब्रँडेड सोनं खरेदी करा केवळ 100 रुपयात, सणासुदीच्या काळात खरेदीची संधी

तनिष्कपासून कल्याण ज्वेलर्सचे ब्रँडेड सोनं खरेदी करा केवळ 100 रुपयात, सणासुदीच्या काळात खरेदीची संधी

सोनेखरेदीची ही योग्य संधी आहे. सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10 हजार रुपयांनी स्वस्त (Gold Rate today) आहेत. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे.

सोनेखरेदीची ही योग्य संधी आहे. सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10 हजार रुपयांनी स्वस्त (Gold Rate today) आहेत. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे.

सोनेखरेदीची ही योग्य संधी आहे. सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10 हजार रुपयांनी स्वस्त (Gold Rate today) आहेत. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: सोनेखरेदीची ही योग्य संधी आहे. सध्या सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 10 हजार रुपयांनी स्वस्त (Gold Rate today) आहेत. त्यामुळे तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. तनिष्क (Tanishq), कल्याण ज्वेलर्ससारख्या (Kalyan jewellers) ब्रँडकडून तुम्ही ऑनलाइन ज्वेलरी केवळ 100 रुपयांत खरेदी करू शकता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus in India) वाढल्यानंतर भारतातील ज्वेलर्सनी 100 रुपयांपर्यंतचे सोने ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली आहे. या काळाने व्यवसायाची पारंपारिक पद्धत बदलण्यास भाग पाडले गेले आहे. आता तनिष्क, कल्याण ज्वेलर्स सारखे मोठे ब्रँडही दागिने ऑनलाईन विकत आहेत.

काय आहे ही ऑफर, वाचा सविस्तर

सोनेखरेदी करण्यामध्ये जगभरात भारताचा दुसरा क्रमांक आहे. मात्र देशभरात कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील विक्री प्रभावित झाली आहे. लॉकडाऊनमुळे टाटा समूहाचा ज्वेलरी ब्रँड असलेले तनिष्क, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड आणि सेन्को गोल्ड अँड डायमंड्स यासारख्या ज्वेलर्सना 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सोने ($ 1.35) थेट त्यांच्या वेबसाइटवर किंवा टाय-अप करून विकण्याची परवानगी मिळाली. याला डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म असे नाव देण्यात आले आहे. कमीतकमी 1 ग्रॅम सोने असणे पुरेसे गुंतवणूक केल्यानंतर ग्राहक डिलिव्हरी घेऊ शकतात.

हे वाचा-Reliance Foundation चा Gender Digital Divide कमी करण्यासाठी नवा उपक्रम

डिजिटल गोल्डची मागणी वाढली

डिजिटल सोन्याची विक्री आता भारतासाठी नवीन नाही. मोबाइल वॉलेट आणि प्लॅटफॉर्म जसं की ऑगमोंट गोल्ड फॉर ऑल आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिल सेफगोल्ड प्रोडक्टसाठी चर्चेत आहे. आत्तापर्यंत ज्वेलर्स अशी उत्पादने ऑनलाइन कण्यास टाळाटाळ करत होते, ही उत्पादने त्यांच्या स्टोअरमध्येच विक्री केली जात असे. भारतात अद्यापही अशास्वरुपात खरेदीला पसंती दिली जाते. दरम्यान असं असलं तरीही डिजिटल गोल्डची मागणी गेल्या काही काळापासून वाढली आहे.

हे वाचा-रोज 76 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवेळी मिळतील 10 लाख, काय आहे LIC ची ही पॉलिसी

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today