जाहिरात
मराठी बातम्या / मनी / फक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया

फक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया

फक्त 10 हजार रुपये गुंतवून लाखोंची कमाई करा; लखपती बनवणाऱ्या 5 बिझनेस आयडीया

तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही हे पाच व्यवसाय फक्त 10 हजार रुपये खर्चून सुरू करू शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 7 ऑक्टोबर : व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल हवं. भांडवलाची गुंतवणूक केल्याशिवाय चांगला फायदा देणारे व्यवसाय करता येत नाहीत, असा एक समज आहे. मात्र, सध्याचा काळ बदलतो आहे. सध्या कमी भांडवलातही व्यवसाय सुरू करून त्यात जम बसवता येऊ शकतो. केवळ 10 हजार रुपयांच्या भांडवलावर व्यवसाय सुरू करून दरमहा भरपूर कमाई करता येईल, असे काही व्यवसाय नक्कीच आहेत. भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये होतकरू व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. याचा उपयोग करून तुमच्या व्यवसायाची गाडी सुरू करता येऊ शकते. व्यवसायाची निवड करताना तुमची आवड, शिक्षण, उपलब्धी या सगळ्याचा विचार करून योग्य तो व्यवसाय निवडणं गरजेचं असतं. कमी भांडवलावर करता येणारे काही व्यवसाय असतात. त्याबद्दल जाणून घेऊ या. टूर गाईड वेगवेगळ्या भाषांची जाण असेल, त्या भाषा बोलता येत असतील, तर टूर गाईडचा व्यवसाय हा कमी भांडवलातील व उत्तम परतावा देणारा व्यवसाय ठरेल. देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना देशातील पर्यटनस्थळांची माहिती देण्याचं काम टूरिस्ट गाईड करतात. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पर्यटकांसोबत फिरतात. या व्यवसायातून चांगला नफा कमवता येऊ शकतो. कुकिंग क्लास स्वयंपाकाची आवड असेल, तर कुकिंग क्लास हा उत्तम पर्याय आहे. उत्तम, चविष्ट स्वयंपाक कसा करायचा, हे शिकवण्यासाठी कुकिंग क्लासेस सुरू करता येऊ शकतात. प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीनंही हे क्लासेस घेता येतील किंवा एखादा युट्युब चॅनल सुरू करूनही पैसे कमवता येऊ शकतात. कुकिंग क्लासच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण रेसिपीज शिकवणं, पदार्थ चविष्ट करण्यासाठीच्या टिप्स देणं, स्वयंपाकघरातील कौशल्य शिकवणं हे सर्व करता येऊ शकतं. वाचा - 12वीनंतर पुढे बिझनेस करण्याची इच्छा आहे? मग ‘या’ क्षेत्रांमध्ये करा व्यवसाय; लाखोंमध्ये कमाई कोचिंग क्लास सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. त्यात टिकून राहण्यासाठी अनेक विद्यार्थी क्लासेसचा आधार घेतात. शिक्षण चांगलं असेल, समजवून सांगण्याची कला असेल, तर कोचिंग क्लासचा व्यवसाय नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. एखादी जागा घेऊन तिथे हा क्लास सुरू करता येतो किंवा घरातच क्लास सुरू केला, तर जागेच्या गुंतवणुकीसाठी भांडवलाचा प्रश्नच उद्भवणार नाही. घरच्याघरी ब्रेड तयार करा घरात राहूनच व्यवसाय करायचा असेल, तर ब्रेड तयार करण्याचा व्यवसाय करता येऊ शकेल. ब्रेडला नेहमीच खूप मागणी असते. त्यामुळे घरच्याघरी ब्रेड तयार करून स्वतःच्या बेकरीत किंवा दुकानात तो विक्रीला ठेवू शकता. शिवाय हा व्यवसाय केवळ 10 हजार रुपयांच्या भांडवलात सुरू करता येऊ शकतो. यासाठी कणिक, मैदा, मीठ, पाणी, बेकिंग पावडर किंवा यीस्ट, साखर, सुकामेवा आणि दूध पावडर हे जिन्नस लागतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जाहिरात तयार करणं जाहिराती तयार करायला आवडत असतील, तर अ‍ॅडव्हर्टायझिंग कॅम्पेन डेव्हलपरचा ऑनलाईन व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी फार भांडवल लागत नाही. थोडं प्रशिक्षण घेऊन एक वेबसाईट तयार करून तुम्ही काम सुरू करू शकता. गुगलवर सर्च करून या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. या साठीचे कोर्स 21 दिवस ते 3 महिन्यांपर्यंतचे असतात. त्यानंतर डिजिटल प्रमोशनचा व्यवसाय सुरू करता येतो. याद्वारे दरमहिन्याला लाखोंची कमाई करता येऊ शकते. कमी भांडवलात व घरच्याघरी करता येतील असे व्यवसायाचे अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. सरकारही अशा व्यावसायिकांना प्रोत्साहन देत आहे. त्याचा वापर करून अशा व्यवसायांमधून लाखोंची कमाई करता येऊ शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात