वेल्स, 28 नोव्हेंबर: एका सिगरेटमुळे महिलेचे प्राण वाचवल्याची घटना नुकतीच समोर (Cigarette saved life of a woman from falling tree) आली आहे. अनेकदा एखादी अशी घटना घडते, की ज्यामुळे येऊ घातलेलं भलंमोठं संकट टळतं. अनेकजण याला योगायोग म्हणतात किंवा इतर अनेक नावांनी याचं वर्णन करतात. मात्र आपला एखादा (Saved with luck by chance) छोटासा निर्णय आपल्यावर येणारं भलंमोठं आणि जीवघेणं संकट थोपवत असल्याचे अनुभव अनेकदा येतात. एका महिलेला काही दिवसांपूर्वीच असा एक थरारक अनुभव आला.
I've just spoken to this pub worker nearly crushed by a tree at The Star in Bridgend. She said: "That cigarette saved my life." #StormArwen pic.twitter.com/3VeLH2DSGQ
— Conor Gogarty (@ConorGogarty) November 27, 2021
सिगरेटनं वाचवले प्राण वेल्समध्ये एका पबमध्ये काम करणारी 55 वर्षांची शेरेल पाऊंड नावाची महिला जीवघेण्या घटनेतून थोडक्यात बचावली. शेरेल ही बारमध्ये ड्रिंक बनवण्याचं काम करते. आपल्या कामातून एक सिगरेट ब्रेक घेण्यासाठी काउंटवरून बाहेर आली आणि स्मोकिंग झोनपाशी जाऊन तिने सिगरेट शिलगावली. मोकळ्या जागेच्या बाजूला असणाऱ्या एका शेडमध्ये उभी राहून ही महिला सिगरेट पेटवत होती. सिगरेट पेटवून तिने एक झुरका घेतला, तो काचेपलिकडून काही करकरल्याचा आवाज तिला येऊ लागला. कोसळलं भलंमोठं झाड बाहेरून येणाऱ्या आवाजामुळे सतर्क झालेली महिला काचेतून बाहेर बघत होती. काही वेळातच एक भलंमोठं झाडं तिथे कोसळळं आणि महिलेपासून केवळ काही फुटांच्या अंतरावर येऊन पडलं. ते पाहून महिलेला जबर धक्का बसला. तिच्यापासून काही फूट अंतरावर झाड कोसळलं होतं आणि जर महिला सिगरेट ओढत नसती, तर घटनेच्या प्रसंगी ती झाडाखालीच असली असती. मात्र सिगरटे ब्रेक घेण्याची बुद्धी तिला सुचली आणि त्यामुळे तिचे प्राण वाचले. हे वाचा- अय्यर-साहामुळे टीम इंडिया संकटातून बाहेर, न्यूझीलंडला दिवसाअखेर पहिला धक्का वेल्समध्ये वादळ वेल्समध्ये सध्या अनेक ठिकाणी वादळं सुरु असून त्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. महिला काम करत असलेल्या पबमध्ये झाड कोसळून 4 टेबलं मोडून पडली. आपण जर काउंटरवर असतो, तर डोक्यात झाड पडून आपला मृत्यू झाला असता, असं या महिलेनं म्हटलं आहे.